• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 10, 2026
in राजकारण
0
शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर
0
SHARES
1
VIEWS

शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर यांची निवड

शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा; सामाजिक कार्याची दखल घेत राज्य कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी

धाराशिव लोकविचार

छत्रपती संभाजीनगर येथे दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. शेतकरी चळवळीशी संबंधित मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातील मेजर रामजीवन बोंदर यांची निवड करण्यात आली.ही बैठक शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्यप्रमुख तथा शेतकरी नेते, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी शेतकरी परिषदेचा राज्यभर विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे, शेतकरी मेळावे व बैठका घेऊन जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी निवडीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन घेण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला.देशसेवेनंतर समाजसेवेचा वसामेजर रामजीवन बोंदर हे पदवीधर असून त्यांनी तब्बल १८ वर्षे देशसेवा केली आहे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा निर्धार करून त्यांनी विविध सामाजिक व राजकीय पदांवर काम करत शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला. अन्यायाविरोधात सातत्याने लढा देत त्यांनी सामाजिक कार्याची वाटचाल सुरू ठेवली आहे.

बोंदर यांनी यापूर्वी कळंब तालुका अध्यक्ष – भाजप किसान मोर्चा, कळंब पंचायत समिती सदस्य – भाजप, कळंब तालुका अध्यक्ष – भाजप, जिल्हाध्यक्ष – शेतकरी संघटना धाराशिव, मराठवाडा अध्यक्ष – शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष – वंजारी सेवा संघ धाराशिव तसेच सरपंच, मौजे वडगाव (शि.), ता. कळंब आदी विविध पदांवर काम केले आहे.

देशसेवेनंतर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा घेऊन त्यांची समाजसेवेची वाटचाल आजही सुरू आहे.

शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआरोग्य विभाग धाराशिव बेमुदत संप आंदोलन मोर्चा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – मा.तालुकाध्यक्ष अमोल जाधव

Next Post

शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर

शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मेजर रामजीवन बोंदर

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!