• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तोतया पोलिसाला अभय कुणाचे? व्हिडिओ पुरावे, अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन तरीही आरोपी मोकाटच!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 24, 2026
in क्राईम
0
तोतया पोलिसाला अभय कुणाचे? व्हिडिओ पुरावे, अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन तरीही आरोपी मोकाटच!
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तोतया पोलिसाला अभय कुणाचे? व्हिडिओ पुरावे, अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन तरीही आरोपी मोकाटच!

शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा अद्याप नाही स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचेही काय झाले?

धाराशिव | लोकविचार

आनंदनगर पोलीस स्टेशन आणि धाराशिव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या कथित तोतया पोलिसाच्या कारनाम्यांबाबत “लोकविचार”ने १७ जून रोजी दोन सविस्तर बातम्या प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. होमगार्ड कार्यालयात घुसून महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी, अश्लील शिवीगाळ, स्वतःला अधिकारी असल्याचा आव आणत शासकीय कामकाजात हस्तक्षेप आणि कार्यालयीन कारभारावर प्रभाव टाकल्याचे गंभीर आरोप त्या बातम्यांमधून समोर आले होते. मात्र, या सर्व प्रकारानंतरही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचे चित्र असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
१७ जून रोजी घडलेल्या या घटनेत मोहरम बंदोबस्तासाठी ड्युटी वाटपाचे काम सुरू असताना संबंधित व्यक्ती थेट जिल्हा होमगार्ड कार्यालयात दाखल झाल्याचा आरोप आहे. महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांना धमकावणे, अधिकाऱ्यांसमोर आदेश देणे, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःला अधिकारी असल्याचा आव आणणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, असे गंभीर आरोप तक्रारींमध्ये करण्यात आले आहेत. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरणही काही कर्मचाऱ्यांनि करून सोशल मीडियावर व्हायरल देखील केले होते.

या संपूर्ण प्रकरणाबाबत “लोकविचार”ने सलग दोन बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित प्रकरणाची जिल्हाभर चर्चा रंगली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना पत्रकारांच्या शिष्टमंडळाने संपर्क साधला असता त्यांनी संबंधित व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला त्याला तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन दिले होते.
मात्र, त्या आश्वासनालाही आता चार दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असून प्रत्यक्षात ना शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल झाल्याचे दिसून येत आहे, ना आरोपीच्या अटकेची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आरोपीचा ठावठिकाणा लागत नाही का? की त्याच्यावर कुणाचे तरी संरक्षण आहे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, हा आरोपी यापूर्वीपासूनच विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आहे. तरीही तो सार्वजनिक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर कारभार करत असल्याचे आरोप होत असताना त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही, हा प्रश्न अधिक तीव्र होत चालला आहे.
कायद्याच्या दृष्टीने पाहता, शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या अधिकृत कामकाजात बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे, कामात अडथळा निर्माण करणे आणि प्रशासनावर दबाव टाकणे ही गंभीर बाब मानली जाते. अशा परिस्थितीत होमगार्ड कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने स्वतंत्रपणे “शासकीय कामात अडथळा” निर्माण केल्याचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या कथित दहशतीमुळे अनेक महिला कर्मचारी उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचेही समोर आले आहे. काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक महिन्यांपासून तो होमगार्ड कार्यालयातील ड्युटी वाटप प्रक्रियेवर प्रभाव टाकत असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणाची केवळ एका घटनेपुरती नव्हे तर मागील काळातील सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवले जाणार का? संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल होणार का? स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याला ताब्यात घेणार का? की पूर्वीप्रमाणेच हे प्रकरणही वेळकाढूपणात अडकून राहणार?
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक आता तरी या प्रकरणात कायद्याचा बडगा उगारून कठोर कारवाईचे आदेश देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार | सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद मो. 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadpolice adhikashakआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिस
Previous Post

राखीव जागेवरून निवडून येऊनही एससी आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का?–राजाभाऊ राऊत यांचा आमदारांना सवाल

Next Post

समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत

Next Post
समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत

समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत

Recent Posts

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.