• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने डीपीडीसी निधीच्या स्थगितीचा तिढा सुटला.!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव, दि.३ (अमजद सय्यद) :जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होण्यामागील डीपीडीसी निधी वाटपातील तिढा अखेर परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मदतीने सुटला आहे.! अकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी त्यांनी मध्यम मार्ग काढत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना कमी जास्त प्रमाणात निधी मिळेल याची हमी दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

या २६८ कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपात जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराला तब्बल १४० कोटी रुपये मिळणार असल्याची चर्चा असून उर्वरित  सर्व लोकप्रतिनिधींना मिळून १२८ कोटी रुपये वाटप होणार आहे.! या वाटपामुळे जिल्ह्यातील विकासकामांमध्ये काहीअंशी फेरबदल होण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे, याआधी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बहुतांश कामांचे पुनर्विचार करून फेरबदल करण्याचे संकेत मिळाले आहेत.

जिल्ह्यातील एका नेत्याच्या अलीकडील प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर राजकीय पातळीवर चर्चेला जोर आला होता. जिल्ह्यातील जनतेच्या विकासकामांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळावा म्हणून पालकमंत्री सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा तिढा सोडविला असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे १४० कोटी निधी मिळवणारा तो सत्ताधारी आमदार कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे. याचबरोबर फेरबदल होणाऱ्या कामांच्या याद्याही  प्रशासकीय स्तरावर मागविले असल्याचे कळते.

प्रशासकीय प्रक्रियेचा वेग अधिक वाढविण्यात येत असून सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व कामांना मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी जवळपास पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीडीसीच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यानंतर निधी वितरणाचा तिढा कायम राहिल्याने जिल्ह्यातील विकासकामांना मोठा ब्रेक बसला होता.

आता मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कामांच्या वाटपाचे सूत्र एका पत्राद्वारे निश्चित करण्यात आले असून हे पत्र थेट मुंबईत तयार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

डीपीडीसीच्या निधीमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या कामांचा प्रश्न सोडवला जाणार आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्थगितीमुळे थांबलेला विकास आता पुन्हा मार्गावर येण्याची चिन्हे आहेत.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: अर्थमंत्रीउपमुख्यमंत्रीकार्यालयजिल्हा नियोजन समिती धाराशिवजिल्हाधिकारीडी पी डी सी धाराशिवडी पी डी सी निधी स्थगितीपालकमंत्रीभारतीय जनता पक्षमहायुतीमहाविकास आघाडीमुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेसविकास कामे ठप्पशिवसेना
Previous Post

आरोग्य कर्मचाऱ्यांनी समायोजनसाठी थाळी नाद आंदोलन

Next Post


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल - जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!