• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समोर येणार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 22, 2026
in महाराष्ट्र
0
पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समोर येणार
0
SHARES
19
VIEWS

पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समोर येणार कोंड येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पीक कापणी प्रयोगास उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची तीव्रता मांडणार

धाराशिव लोकविचार

पीक कापणी प्रयोग हा केवळ आकडेवारी नोंदविण्याचा भाग नसून, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणून त्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीचा आधार ठरणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या वेळी शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून ही प्रक्रिया पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने होत आहे याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील कोंड येथे मंगळवारी सकाळी शेतकरी संगीता भागवत पतंगे यांच्या शेतात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगास आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली.

यावेळी त्यांनी शिवारातील पिकांची स्थिती तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.विशेष म्हणजे, संगीता पतंगे यांच्या शेतात विहिरीची उपलब्धता असूनही पिकाला पाणी देण्यात आले होते. मात्र, पीक कापणी प्रयोगात ४० ग्रॅम एवढेच उत्पादन नोंदविण्यात आले असून, त्यानुसार हेक्टरी केवळ ४ क्विंटल उत्पादन येत असल्याचे स्पष्ट झाले. प्रतिकूल हवामान, पावसातील मोठे खंड आणि पिकांच्या खुंटलेल्या वाढीचा उत्पादनावर किती गंभीर परिणाम झाला आहे, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

हे अत्यल्प उत्पादन पीक कापणी प्रयोगाच्या नोंदीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्ह्यात अनेक ठिकाणी उभे पीक दिसत असले तरी अपेक्षित उत्पादन मिळेलच, अशी परिस्थिती नाही. पावसातील मोठे खंड, पिकांची खुंटलेली वाढ आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी बांधवांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ कागदावरील अंदाज किंवा पिकाची बाह्य स्थिती न पाहता पीक कापणी प्रयोगातून प्रत्यक्ष मिळणारे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे वास्तविक नुकसान अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्यात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी व आढावा घेणार आहेत. यावेळी पीक कापणी प्रयोगातून समोर येणारे दाहक वास्तव, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई, प्रभावी पीकविमा मदत, चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती सोनाली गाडेकर, मंडल कृषी अधिकारी मजीद शेख, कृषी पर्यवेक्षक लेनेकर, कृषी सहायक श्रीमती सलमा तांबोळी, तलाठी माळी, विमा कंपनीचे प्रतिनिधी अमर भडंगे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

Next Post

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!