45 मीटर उंच ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्टला लोकार्पण, पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित धाराशिवच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य स्वराज्य ध्वजाचे 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण
धाराशिव लोकविचार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या भव्य ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 45 मीटर उंच असलेल्या या स्वराज्य ध्वजाच्या लोकार्पण सोहळ्यास धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या भव्य प्रकल्पासाठी सुमारे 90 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, धाराशिवच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात या स्वराज्य ध्वजामुळे आणखी भर पडणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.
लोकवीचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











