• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये १५१ फुटी स्वराज्य ध्वजाचे दिमाखात लोकार्पण

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवमध्ये १५१ फुटी स्वराज्य ध्वजाचे दिमाखात लोकार्पण
0
SHARES
243
VIEWS

धाराशिवमध्ये १५१ फुटी स्वराज्य ध्वजाचे दिमाखात लोकार्पण;

 “भगवा ध्वज फडकवताना अलौकिक ऊर्जा जाणवली, उर अभिमानाने भरून आले” — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव लोकविचार 

 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर अर्थात १५१ फुटी भव्य स्वराज्य ध्वजाचे लोकार्पण आज स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याला शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठा साम्राज्याचा मानबिंदू असलेला हा स्वराज्य ध्वज फडकवताना एक अलौकिक ऊर्जा जाणवली आणि उर अभिमानाने भरून आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले.

धाराशिव शहरात भव्य भगवा ध्वज उभारण्यात यावा, ही मराठा समाजाची प्रमुख आणि सातत्याने मांडण्यात आलेली मागणी होती. 

या मागणीची दखल घेत धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) ऑगस्ट २०२५ मधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाकडे विशेष लक्ष देत प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

भगवा ध्वज हा केवळ एक झेंडा नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे. लाखो मराठ्यांसाठी प्रेरणा आणि बळ देणारा हा ऊर्जा स्रोत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात डौलाने फडकणारा हा १५१ फुटी स्वराज्य ध्वज धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच या परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करून देणार आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या चौकात उभारण्यात आलेला हा भव्य ध्वज नागरिकांच्या अभिमानाचा विषय ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या लोकार्पण सोहळ्यास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे, नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके, मराठा सेवक बलराज रणदिवे, आकाश कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: Lokvichar लोकविचारयू
Previous Post

45 मीटर उंच ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्टला लोकार्पण,

Next Post

१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा गौरव

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा गौरव

१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा गौरव

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!