• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 21, 2026
in क्राईम
0
सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
857
VIEWS

सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

सिंदगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक सुरेश बिराजदार ताब्यात; धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धाराशिव लोकविचार 

 पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच (प्रशासक) सुरेश श्रीमंत बिराजदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी (दि. २१) दुपारी जळकोट येथे ही सापळा कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा २४ वर्षीय मजूर असून त्याला व त्याच्या मित्राला २०२५-२६ या वर्षात पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. संबंधित लाभार्थ्यांना दोन हप्ते मिळाले असून तिसरा हप्ता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून मंजूर करून देण्यासाठी सुरेश बिराजदार यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराकडून त्याच्या घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी ४ हजार रुपये, तर त्याच्या मित्राच्या घरकुलाच्या हप्त्यासाठी ७ हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी शुक्रवारी पंचांसमक्ष करण्यात आली. जळकोट येथे झालेल्या पडताळणीदरम्यान आरोपी सुरेश बिराजदार यांनी तक्रारदाराकडे एकूण ११ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.

जळकोट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील रस्त्यावर तक्रारदाराने पंचांसमक्ष आरोपीला ११ हजार रुपये दिले. ही रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सुरेश बिराजदार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.

सदरील कारवाई  पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब एम. नरवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक विजय वगरे, पोहवा आशिष पाटील, पोहवा अमर माने, चापोहवा करडे आणि पोशी जाकिर काझी यांनी केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;

Next Post

लोकविचार इम्पॅक्ट : २४ तासांत रस्त्यावर उतरली वाहतूक यंत्रणा

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
लोकविचार इम्पॅक्ट : २४ तासांत रस्त्यावर उतरली वाहतूक यंत्रणा

लोकविचार इम्पॅक्ट : २४ तासांत रस्त्यावर उतरली वाहतूक यंत्रणा

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!