• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 24, 2026
in क्राईम
0
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
0
SHARES
158
VIEWS

धाराशिव बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला; सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

सुरक्षारक्षक नेमके करतात काय? सीसीटीव्ही केवळ नावापुरते? स्थानक प्रमुखांच्या कार्यपद्धतीवरही कर्मचारी-प्रवाशांचे सवाल

धाराशिव | लोकविचार 

 महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पालकत्वाखालील धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्याच्याच खिशावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली. त्यामुळे बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आणि स्थानक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अशोक रेणापूरकर हे कामानिमित्त लातूरकडे जाण्यासाठी धाराशिव बसस्थानकात आले होते. सकाळी सुमारे ११ वाजता फलाट क्रमांक १८ वरून पंढरपूर–नागपूर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बसमध्ये चढल्यानंतर पाकीट चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ बस थांबवून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली.

यानंतर संबंधित बस फलाट क्रमांक १६ वर सुमारे अर्धा ते एक तास थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी बस स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या कार्यालयाकडे नेण्यात आली. या प्रक्रियेमुळे बसमधील प्रवाशांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, चोरीसारख्या गंभीर घटनेनंतरही सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग तातडीने आणि प्रभावीपणे होतो का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सुरक्षारक्षक नेमके करतात काय?

धाराशिव बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले असतानाही पोलिस कर्मचाऱ्याच्याच खिशावर डल्ला मारला जात असेल, तर हे सुरक्षारक्षक नेमके कुठे असतात आणि त्यांच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. बसस्थानकात गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबविली जाते का, याचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा केवळ नावापुरती?

बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा केवळ नावापुरती असल्याची चर्चा असून, चोरीची घटना घडल्यानंतर फुटेज तपासण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. बसस्थानकातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांचे कॅमेरे कार्यरत आहेत का, त्यांचे नियमित निरीक्षण कोण करते आणि फुटेज तातडीने उपलब्ध होते का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

स्थानक प्रमुखांच्या कार्यपद्धतीवरही सवाल

दरम्यान, स्थानक प्रमुखांच्या कार्यपद्धतीबाबतही कर्मचारी व प्रवाशांमध्ये नाराजी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्थानक प्रमुख शासनाने निर्धारित केलेल्या गणवेशात न राहता साध्या वेशात वावरत असल्याचा आरोप केला जात असून, अधिकारी म्हणून त्यांची ओळख आणि जबाबदारी स्पष्टपणे दिसून येते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानक प्रमुख मुख्यालयी न राहता दररोज कळंब येथून ये-जा करत असल्याच्या प्रतिक्रियाही कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहेत. कामानिमित्त त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही काही कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

टपऱ्या, पार्किंग आणि अतिक्रमणाचा प्रश्न कायम

बसस्थानकाच्या प्रवेशद्वार परिसरात अनेक टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापल्याचे चित्र आहे. तसेच बसस्थानकाच्या विविध बाजूंना वाहने उभी राहत असल्याने बसच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. या अतिक्रमणांवर आणि अनधिकृत पार्किंगवर कारवाई का होत नाही, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

टपरीधारकांकडून ‘चिरीमिरी’ घेतली जात असल्याचा आरोपही दबक्या आवाजात केला जात असला, तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

पोलीस प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात

बसस्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. बसस्थानकात पोलिसांची ड्युटी असतानाही चोरीच्या घटना घडत असतील, तर बंदोबस्ताची प्रभावीता काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिस कर्मचारीच बसस्थानकात पाकीटमारीचा बळी ठरल्याने सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे बसस्थानकातील सुरक्षारक्षकांची उपस्थिती, सीसीटीव्ही यंत्रणेची कार्यक्षमता, अनधिकृत टपऱ्या, पार्किंग व्यवस्था, स्थानक प्रमुखांची कार्यपद्धती आणि पोलीस बंदोबस्त या सर्व बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पालकत्वाखालील धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातच पोलिसाच्या खिशावर डल्ला पडत असेल, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? असा सवाल आता प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपाकिटमार
Previous Post

पथविक्रेत्यांना ओळखपत्र-विक्री प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना 

Next Post

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
क्राईम

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

September 22, 2026
Next Post
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!