• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई…परंड्यात 57 हजारांच्या अमली पदार्थ पदार्थासह एकाला अटक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 16, 2026
in क्राईम
0
अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई…परंड्यात 57 हजारांच्या अमली पदार्थ पदार्थासह एकाला अटक
0
SHARES
232
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई…परंड्यात 57 हजारांच्या अमली पदार्थ पदार्थासह एकाला अटक

नळदुर्ग लोकविचार प्रतिनिधी अझहर शेख

अमली पदार्थविरोधी कृती दलाने (ANTF) परंडा शहरात धाडसी कारवाई करत सुमारे 57 हजार 200 रुपयांचा अवैध अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

दि. 15 जून 2026 रोजी अमली पदार्थविरोधी कृती दल, छत्रपती संभाजीनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात एक इसम अमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे संबंधित पथकाने दोन पंच व अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांना सोबत घेऊन सापळा रचला.मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शाहिद सादिक शेख (रा. परंडा) याच्यावर छापा टाकण्यात आला.

त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून विविध प्रकारच्या अमली व प्रतिबंधित औषधी गोळ्या आढळून आल्या.झडतीदरम्यान नायट्राझेपाम घटक असलेल्या 15 गोळ्या किंमत 6 हजार रुपये, इतर प्रतिबंधित घटक असलेल्या 10 गोळ्या किंमत 4 हजार रुपये तसेच आणखी एका प्रकारच्या प्रतिबंधित घटकांच्या 93 गोळ्या किंमत 37 हजार 200 रुपये असा साठा जप्त करण्यात आला.

याशिवाय एक विवो कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. एकूण 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.सदर इसम हा अमली पदार्थांच्या गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी पंच व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीसह परंडा पोलीस ठाण्यात हजर केले.

याप्रकरणी सहाय्यक फौजदार वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 390/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(अ) तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमाच्या कलम 18(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलीस अधीक्षक अजित टिके व उपविभागीय पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरिश्चंद्र मुंढे व ज्योती कीर्तीकर यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरंडा पोलीसभूम परंडा वाशीलोकविचार
Previous Post

बांधकाम कामगार नोंदणी घोटाळ्याचा ‘महास्फोट’! बनावट सह्या-शिक्क्यांद्वारे कोट्यवधींच्या अपहार? चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन खरात

Next Post

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

Next Post
आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

Recent Posts

  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.