• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महामार्गावरील धावत्या टेम्पोवरील मालचोरीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 23, 2026
in क्राईम
0
महामार्गावरील धावत्या टेम्पोवरील मालचोरीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद
0
SHARES
40
VIEWS

महामार्गावरील धावत्या टेम्पोवरील मालचोरीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद, १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव लोकविचार सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोवर चढून ताडपत्री फाडत आतील माल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ जून २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-धुळे महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोवर चढून अज्ञात चोरट्यांनी ताडपत्री फाडत आतील साहित्य चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा गंभीर व संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना दिले होते.त्यानुसार दि. २२ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संतोष राजेंद्र शिंदे (वय २२, रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा) याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या अन्य साथीदारांसह सदर चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या ओकस्मिथ व्हिस्कीच्या ९ बॉक्ससह एकूण १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून अटक आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पो. ह. शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, म. पो. ह. शोभा बांगर, चा. पो. ह. रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचारपोलिस
Previous Post

उस्मानाबाद – लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!