• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 24, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

Jiधाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगरपरिषद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील अनेक वर्षांपासून फाईल गहाळ होणे, फाईल चोरी जाणे, कामांमधील साहित्य गायब होणे अशा विविध प्रकारांमुळे नगरपरिषद चर्चेत राहिली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या विभागांकडून चौकशाही सुरू आहेत.तर काही अधिकारी कारागृहाची हवा देखील खाऊन आले आहेत, तत्कालीन लेखापालांनाही विविध कारणांमुळे जेलवारी करावी लागली. मात्र, आजघडीला परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
सध्या नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. तरीही अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा अपेक्षित अंकुश नसल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या ‘तिजोरी’ समजल्या जाणाऱ्या अकाउंट विभागातच ठेकेदाराचा थेट वावर असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.
मुख्य लेखापालांच्या शेजारी असलेल्या सहाय्यक लेखापालांच्या खुर्चीवर एका गुत्तेदाराचा कार्यालयीन वेळेत बसण्याचा प्रकार उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. संबंधित काही ठेकेदार हे अकाउंट विभागात राजरोसपणे बसत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी दबक्या आवाजात व्यक्त केला आहे. इतक्या महत्त्वाच्या विभागात बाहेरील व्यक्तीचा मुक्त प्रवेश आणि बसण्याचा अधिकार नेमका कोणी दिला, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
यापूर्वी अकाउंट विभागातून धनादेश गहाळ झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर मुख्य लेखापालांकडूनच सहाय्यक लेखापालांची खुर्ची ठेकेदाराला वापरू दिली जात असेल, तर भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नगरपरिषदेतील आर्थिक व्यवहारांशी थेट संबंधित असलेल्या विभागात ठेकेदारांचा मुक्त वावर हा नियमबाह्य असून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आता तरी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नियमांचे काटेकोर पालन करायला भाग पाडणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव नगरपरिषदेत सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, पारदर्शक व जबाबदार कारभाराची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!