• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तोतया पोलिसाची होमगार्ड कार्यालयात घुसून महिलांना दमदाटी! “मी अधिकारी आहे” म्हणत अश्लील शिवीगाळ!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 17, 2026
in क्राईम
0
तोतया पोलिसाची होमगार्ड कार्यालयात घुसून महिलांना दमदाटी! “मी अधिकारी आहे” म्हणत अश्लील शिवीगाळ!
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होमगार्ड कार्यालयात तोतया पोलिसाचे साम्राज्य? प्रशासकीय अधिकाऱ्याच्या संगनमताच्या आरोपांमुळे खळबळ! 

तोतया पोलिसाची होमगार्ड कार्यालयात घुसून महिलांना दमदाटी! “मी अधिकारी आहे” म्हणत अश्लील शिवीगाळ!

 लोकविचारचा इम्पॅक्ट, व्हिडिओ व्हायरल होताच तक्रार प्रक्रियेला वेग

धाराशिव लोकविचार 

आनंदनगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणातील आरोप असलेल्या कथित तोतया पोलिसाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून, यावेळी थेट होमगार्ड कार्यालयातील कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोहरम बंदोबस्तासाठी ड्युटी वाटपाचे काम सुरू असताना संबंधित व्यक्तीने कार्यालयात घुसून महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि कथित जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.! या प्रकरणात संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि तोतया पोलिस यांच्यातील कथित संगनमताचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून माहितीनुसार, होमगार्ड कार्यालयात ड्युटी वाटप सुरू असताना तोतया पोलिस राम बोंदर हा कार्यालयात दाखल झाला. यावेळी तो प्रशासकीय अधिकारी गणेश कवनकर यांच्या समोरच खुर्चीवर बसून स्वतःला अधिकारी असल्याप्रमाणे वागत कर्मचाऱ्यांना आदेश देत होता. “मी अधिकारी आहे, तुम्ही मला ओळखत नाही का?” अशा शब्दांत त्याने महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी उभे असताना तो खुर्चीवर बसून कारभार चालवत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारादरम्यान काही महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. तसेच जातीवाचक टिप्पणीही करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र संबंधित व्यक्तीची इतकी दहशत आहे की, अनेक महिला कर्मचारी उघडपणे बोलण्यास आणि कॅमेऱ्यासमोर येण्यास घाबरत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील एक वर्षापासून संबंधित तोतया पोलिसाने होमगार्ड कार्यालयातील ड्युटी वाटप प्रक्रियेवरच अनधिकृतपणे प्रभाव निर्माण केल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोणाला बंदोबस्ताची ड्युटी द्यायची, कोणाला वगळायचे, कोणाला वारंवार संधी द्यायची याचे नियोजन तोच करत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मागील एक वर्षातील ड्युटी वाटपाचा अहवाल तपासण्याची मागणी होत आहे. अनेक महिला कर्मचाऱ्यांना सातत्याने बंदोबस्त ड्युटी देण्यात आल्याचे, तर काहींना एकदाही संधी देण्यात आली नसल्याचे आरोप केले जात आहेत. रोटेशन पद्धतीला फाटा देऊन निवडक व्यक्तींनाच ड्युट्या देण्यात आल्याची चर्चा असून, काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर संतप्त झालेल्या महिला व पुरुष होमगार्ड कर्मचाऱ्यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ “लोकविचार”च्या माध्यमातून समोर आल्यानंतर तक्रार प्रक्रियेला वेग आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात “लोकविचारचा इम्पॅक्ट” स्पष्टपणे दिसून आल्याचे बोलले जात आहे.

आनंद नगर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणातील आरोप असतानाही संबंधित व्यक्ती सार्वजनिक कार्यालयात बिनधास्तपणे वावरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या तक्रारी, व्हिडिओ पुरावे आणि वरिष्ठांना माहिती असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महिला कर्मचाऱ्यांच्या मते, काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित संरक्षणामुळेच संबंधित व्यक्तीचे मनोबल वाढले असून त्याची दहशत कायम आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची सखोल चौकशी करून होमगार्ड कार्यालयातील ड्युटी वाटप, कथित संगनमत आणि संबंधित व्यक्तीच्या भूमिकेची चौकशी करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सध्या तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात नेमकी कोणावर आणि कोणत्या कलमांखाली कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतोतया पोलिसधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिसधाराशिव लोकविचार
Previous Post

कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार विठ्ठल चौधरी यांना ‘ग्रेड PSI’ दर्जा पोलीस दलात आनंदाचे वातावरण

Next Post

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धक्का? नाराज मतदार, अंतर्गत धुसफूस आणि वाढलेले टेन्शन; बसवराज पाटील यांचे गणित बिघडणार की महेश देशमुखांना लाभ होणार?

Next Post
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धक्का? नाराज मतदार, अंतर्गत धुसफूस आणि वाढलेले टेन्शन; बसवराज पाटील यांचे गणित बिघडणार की महेश देशमुखांना लाभ होणार?

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धक्का? नाराज मतदार, अंतर्गत धुसफूस आणि वाढलेले टेन्शन; बसवराज पाटील यांचे गणित बिघडणार की महेश देशमुखांना लाभ होणार?

Recent Posts

  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.