• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ऑपरेशन मुस्कान-14 मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी एएचटीयूच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते सत्कार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 14, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

ऑपरेशन मुस्कान-14 मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी एएचटीयूच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते सत्कार

हरवलेल्या व पीडितांचा शोध घेऊन सुरक्षित सुटका करण्यात पथकाचे मोलाचे योगदान

धाराशिव | लोकमदत न्यूज

महाराष्ट्र पोलिसांतर्गत धाराशिव जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान-14 मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एएचटीयू (Anti Human Trafficking Unit) धाराशिव येथील अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपस्थित होते.
या मोहिमेदरम्यान हरवलेल्या व पीडित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची सुरक्षित सुटका करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पथकाला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के एस. ए., म.हे.कॉ. नदाफ आर. एस., म.हे.कॉ. पुरी व्ही. पी., म.हे. कॉ. जाधव ए. एस., हे. कॉ. केवटे डी. के., हे. कॉ. माने एन. एस. तसेच पो.कॉ. कंदले ए. व्ही. यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पथकाने हरवलेल्या व पीडित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरीत्या त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याचे कार्य केले.
या मोहिमेदरम्यान पोलीस ठाणे कळंब गुन्हा क्र. 414/2023 (कलम 363, 370 भा.दं.वि.), कळंब पोलीस ठाणे गुन्हा क्र. 178/2025 (कलम 137(2), 143 बीएनएस) तसेच पोलीस ठाणे ढोकी गुन्हा क्र. 181/2023 (कलम 363, 370 भा.दं.वि.) या प्रकरणांमध्ये तपास करत पीडितांचा शोध घेण्यात या पथकाने उल्लेखनीय यश संपादन केले.
दरम्यान, गुन्ह्यांची गुंतागुंत, तपासातील अडचणी आणि विविध आव्हाने असूनही एएचटीयू पथकाने चिकाटीने तपास करत अल्पावधीत यश संपादन केले. या कामगिरीमुळे पोलिसांबद्दल समाजात विश्वास आणि सकारात्मक प्रतिमा अधिक दृढ होण्यास मदत झाल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पुढील काळातही अशाच प्रकारे गुन्ह्यांचा छडा लावत पीडितांना न्याय मिळवून देत पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात महायुती अभेद्य…

Next Post

लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार – सभापती लोंढे

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार - सभापती लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!