• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 16, 2026
in राजकारण
0
धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?
0
SHARES
125
VIEWS

‘धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे? सत्ताधारी भाजप लोकप्रतिनिधींना माजी नगरसेवक सोमनाथ गुरवांचा थेट सवाल!

धाराशिव लोकविचार 

शहराचे ‘उस्मानाबाद’वरून ‘धाराशिव’ असे नामांतर होऊन बराच काळ लोटला असतानाही तेरणा जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अद्याप ‘उस्मानाबाद’ हे जुने नाव कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी नगर परिषद सत्ताधारी भाजप नगरसेवकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

गुरव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहराचे अधिकृत नामांतर झाल्यानंतरही सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी जुन्या नावाचा फलक कायम कसा राहतो? सत्ताधाऱ्यांना हा फलक दिसत नाही का, की सत्ताधाऱ्यांना या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही? असा सवाल त्यांच्या भूमिकेतून उपस्थित झाला आहे.

‘हिंदुत्वाचे पांघरूण घेणाऱ्या पुढाऱ्यांना नामांतराचा विसर पडला का?’ असा थेट टोला गुरव यांनी लगावल्याने आता या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. नामांतराच्या मुद्द्यावर राजकीय श्रेय घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात शहरातील जुन्या नावांचे फलक बदलण्यासाठी काय केले, याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.

विशेष म्हणजे, तेरणा जलशुद्धीकरण केंद्रासारख्या शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणी ‘नगर परिषद धाराशिव’ आणि ‘धाराशिव शहर पाणीपुरवठा योजना’ अशी योग्य नावे लावण्यात यावीत, अशी मागणी गुरव यांनी केली आहे.

“दोन दिवसांत नाव बदलले नाही, तर शिवसेना स्वखर्चाने फलक लावणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा केवळ नामफलकाचा विषय न राहता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

शहराचे नामांतर झाल्यानंतरही शासकीय, निमशासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी जुन्या नावांचे अवशेष कायम असतील, तर नामांतराच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि नगर परिषद प्रशासन या गंभीर मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेणार? जुना फलक कधी हटवणार? याकडे आता धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोमनाथ गुरव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी नगरसेवकांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार का आणि प्रशासन तातडीने कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

लोकविचारच्या १० हजार फॉलोअर्सचा टप्पा

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!