• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 17, 2026
in महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत
0
SHARES
11
VIEWS

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत – पाटील
मंगळागौरनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव लोकविचार

प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आदींसह इतर योजनेंतर्गत आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आवास योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. नुकतीच प्रधानमंत्री आवास योजनेची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. या यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांनी हक्काच्या घरकुल योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.३१ ऑगस्टपर्यंत आपली नावे ग्रामपंचायत तसेच आवास प्लस या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दि.१६ ऑगस्ट रोजी केले. मंगळागौरी आगमनानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीचे खेळ दि.१ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, दत्तात्रय देऊळकर, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पचे मेघराज पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाल्या की, २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार २३२ लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यापैकी ८९ हजार ८९४३ लाभार्थी पात्र तर १९१८९ लाभार्थी अपात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या याद्यांचे १५ ऑगस्टपासून ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येत आहे. त्यामध्ये काही लाभार्थी अपात्र ठरले तर त्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमित करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना जागा नाही त्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजने अंतर्गत १ हजार स्क्वेअर फुट जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलर व शौचालय असे एकूण २ लाख रुपये रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. टप्पा – १ २०१६-२२ या कालावधीत विविध योजनेची १२८०४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर २०२२ ते २०२६ या कालावधीत ६७७६० घरकुले मंजूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मंगळागौरीच्या आगमनानिमित्त लेडीज क्लबच्यावतीने महिलासाठी मुंबई येथून मंगळागौरीचे खेळ करणारा एक ग्रुप खेळ सादर करण्यासाठी येणार आहे. विशेष म्हणजे सर्व सख्यांसाठी श्रावण आणि गौरी सणाबरोबरच माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे तसेच सासु-सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य अशा भरगच्च मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी लेडीज क्लब येथे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्पर्धा देखील असून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकास ५० हजार रुपये, द्वितीय ३५ हजार रुपये, तृतीय २५ हजार रुपये व प्रोत्साहनपर ११ हजार रुपयांची ३ आणि ५००१ रुपयांची २ बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच सासु-सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट अग आई, अहो आई हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर डॉ. साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा आनंद माहेरच्या मायेने आणि आपुलकीने साजरा करूया असे आवाहन पाटील यांनी केले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादघरकुलजिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटीलधाराशिवधाराशिव ग्रामीणधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

Next Post

“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!