आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती ‘तक्रारी ऐका, अन्यथा आम्हालाही आत्मसंरक्षणाची परवानगी द्या’ अशी आक्रमक भूमिका
धाराशिव लोकविचार
तालुक्यातील आळणी येथील असंख्य ग्रामस्थांनी गावातील विविध तक्रारी आणि कथित गावगुंडांच्या त्रासाविरोधात तसेच गावात सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे शाळकरी मुलींना होणारा रोड रोमिओ चा त्रास या सह विविध मागण्यासाठी आज थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आंदोलन केले. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः खाली येऊन तक्रारी ऐकाव्यात, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून क्यूआरटी पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
भर पावसात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले असून शाळकरी मुलींनीही गावातील काही व्यक्तींकडून होत असलेल्या कथित त्रासाबाबत कारवाईची मागणी केली. तसेच शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


