• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 24, 2026
in महाराष्ट्र
0
जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

जिल्ह्यातील पाणीसाठा ५.३४ टक्क्यांवर; विशेष पॅकेजच्या मागणीसह पाणीपुरवठ्याचा कृती आराखडा तयार होणार!

मुंबई | लोकविचार

धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आगामी काळात पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती, संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील पाणीटंचाईचा आढावा घेताना धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थितीही दिवसेंदिवस खालावत असून, मागील महिन्यात सुमारे ८ टक्के असलेला पाणीसाठा एका महिन्यात घसरून अवघ्या ५.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील अत्यल्प पाणीसाठ्याची वस्तुस्थिती मांडत जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्या मंत्रालयात होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनिश्चित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट आणि मर्यादित जलसाठा यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्याऐवजी आतापासूनच नियोजन करण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, पर्यायी जलस्रोतांचा वापर, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तातडीच्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे.

या बैठकीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ सचिव, धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

गावोगावी पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना!

धाराशिव जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश आहे. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, आवश्यक निधीची उपलब्धता, विविध विभागांतील समन्वय आणि दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा अवघ्या ५.३४ टक्क्यांवर आल्याने आता मंत्रालयातील या बैठकीत कोणते निर्णय होतात, धाराशिवसाठी विशेष पॅकेज मंजूर होते का आणि ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना जाहीर होतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआढावा बैठकआमदार कैलास पाटीलदुष्काळधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपाणी टंचाईमंत्रालयशेतकरी
Previous Post

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

Related Posts

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026

ताज्या घडामोडी

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक मैदानात; उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

November 24, 2026
दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!