शिवसेना मा.जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश; १६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल!
दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; पाणी दाखल होताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण, मोहन पनुरे यांचे ग्रामस्थांकडून आभार
धाराशिव लोकविचार
गेल्या काही काळापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या लाभार्थी गावांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, १६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचल्याने संबंधित १६ गावांतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून गावोगावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाणीपुरवठा योजनेचे पाणी प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रात दाखल व्हावे आणि नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मोहन पनुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,खा.ओमराजे निंबाळकर,शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले आणि तानाजी सावंत,युवा नेते मल्हार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने यश मिळाल्याचे मोहन पनुरे यांनी सांगितले.
या योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर मोहन पनुरे यांनी या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त केले. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ लक्षात घेता, १६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी दाखल होणे ही गावकऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
दरम्यान, पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित गावांतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या कामासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
१६ गावांच्या पाणीप्रश्नाच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्रात पाणी दाखल होणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता पाणी शुद्धीकरणानंतर संबंधित गावांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू होण्याची ग्रामस्थांना अपेक्षा आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










