संभाजी राजेनिंबाळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव नगर परिषद येथील वसुली विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले संभाजी (काका) राजेनिंबाळकर हे सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी राजेनिंबाळकर यांच्या सेवाकार्याचा गौरव करत सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी व सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षांच्या सेवेनंतर नव्या पर्वाची सुरुवात करताना मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक खलिफा कुरेशी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक आयाज उर्फ बबलू भैया शेख, सुनील आंबेकर, सर्फराज कुरेशी, माजी नगरसेवक बाबा मुजावर, नरसिंग मिटकरी, मजहर शेरीकर यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786











