• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजापूर आगार बंदचा इशारा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 2, 2026
in महाराष्ट्र
0
तुळजापूर आगार बंदचा इशारा
0
SHARES
1.6k
VIEWS

आगारप्रमुखांच्या कथित मनमानीविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ५ ऑक्टोबरला तुळजापूर आगार बंदचा इशारा

तक्रारींचा पाढा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर; ‘पाठीशी घालण्यामुळेच आगार तोट्यात’ असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

तुळजापूर | लोकविचार

तुळजापूर एसटी आगारातील आगारप्रमुखांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांमधील असंतोष उघडपणे समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर आगार बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले असून, आगारातील परिस्थितीवर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, तुळजापूर आगार, धाराशिव विभागाच्या वतीने पालकमंत्री तथा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, प्रादेशिक अधिकारी छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी, तहसीलदार तुळजापूर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विभाग नियंत्रक धाराशिव तसेच विभागीय वाहतूक अधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवेदनावर संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत २० फेब्रुवारी २०२६, २० ऑगस्ट २०२६ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, या पत्रांनंतरही कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आगारातील चालक, वाहक, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बी. एम. पवार यांचे चुकीच्या पद्धतीने केलेल्या निलंबनाबाबत, एस. पी. भोसले, एस. एस. मुंडे आणि अर्चना वंजारे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबतही कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर गाड्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याने बससेवा प्रभावित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सहाय्यक वाहतूक अधीक्षकांकडून कर्मचाऱ्यांच्या रजेच्या अर्जांसह विविध बाबींवर योग्य विचार केला जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. वाहतूक नियंत्रक कक्षासाठी मंजूर पदांनुसार कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, मंजूर संख्येपेक्षा कमी कर्मचारी असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करावी, लांब पल्ल्याच्या ड्युट्या निश्चित कराव्यात तसेच तुळजापूर आगाराला एटीएस आणि डब्ल्यूएसची आवश्यक पदे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सेवा ज्येष्ठतेनुसार ग्रुप रोटेशन लागू करावे आणि चालक-वाहकांचा रजाकोटा एकाच अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी लोकप्रतिनिधींसमोर मांडल्यास अथवा लोकप्रतिनिधींनी फोन करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचारणा केल्यास संबंधित लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

‘आमचे पालक म्हणून आगार व्यवस्थापकांशी चर्चा करण्यासाठी गेल्यास मी सक्षम प्राधिकारी आहे, मला योग्य वाटेल तीच कार्यवाही करणार,’ अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. या आरोपांमुळे आगार प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तुळजापूर आगाराला अचानक भेट दिल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगारातील विविध प्रश्न आणि आगारप्रमुखांविरोधातील तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चालक-वाहक शुकांबाबतच्या कारणावरून बेसिक च्या दहा टक्के दंडाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी आपली बाजू विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती कारवाई करू अशी भूमिका विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बैठकीत आगारप्रमुखांनाही कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्नांवरून जाब विचारल्याचे सांगण्यात येते. संबंधित कर्मचाऱ्याचे झालेले नुकसान अन्य मार्गाने भरून काढण्याचा प्रयत्न करू, असे आगारप्रमुखांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुकवर करण्यात आलेल्या नोंदींचे काय, असा सवाल उपस्थित होताच वातावरण आणखी तापल्याची माहिती आहे.

काही ठराविक अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसमोर केला. सहाय्यक वाहतूक अधीक्षकांनाही आगारप्रमुखांकडून वारंवार पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्याकडे केवळ स्वाक्षरीपुरते काम ठेवण्यात आले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

तुळजापूर आगारातील मागील काही महिन्यांच्या कारभाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असताना वरिष्ठ अधिकारी आगारप्रमुखांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पुढे आला आहे. आगारातील प्रशासकीय निर्णय, बसच्या दुरुस्तीतील कथित विलंब आणि परिणामी काही बससेवा रद्द होण्याच्या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर परिणाम होत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

तुळजापूर आगार मागील तीन-चार महिन्यांपासून तोट्यात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगारातील परिस्थितीची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

आगारप्रमुखांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मागण्या व तक्रारींची दखल घेऊन योग्य तो निर्णय न झाल्यास ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर आगार बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या बंददरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आरोपांची आणि आगारातील प्रशासकीय कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. पालकमंत्री तथा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात लक्ष घालून तुळजापूर आगारातील परिस्थितीची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र

ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

October 1, 2026
Next Post
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!