• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 28, 2026
in क्राईम
0
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
0
SHARES
1.3k
VIEWS

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा 275 किमी दूर नेऊन मृतदेह जाळला,

 जामखेडमध्ये धागा अन् कळंबमध्ये सापळा; धाराशिव पोलिसांनी (एल सी बी) असा लावला सहाही आरोपींचा छडा

गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा उलगडा; उलगडा; सहाही आरोपींना गजाआड करण्यात धाराशिव पोलिसांची निर्णायक भूमिका

पहिल्या चार आरोपींचा जामखेडमधून शोध; कळंबमध्ये सापळा रचून उर्वरित दोघांना अटक, गुन्ह्यातील कारही जप्त

धाराशिव | लोकविचार

धुळे जिल्ह्यातील नरवळ परिसरात गर्भवती नर्तिकेचा निर्घृण खून करून पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्याच्या अमानवीय घटनेचा उलगडा करण्यात धाराशिव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रकरणात धुळे पोलिसांनी तपासासाठी मदत मागितल्यानंतर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत जामखेड येथून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर कळंब पोलिसांनी सापळा रचून फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींना अटक केली. अशा प्रकारे या गुन्ह्यातील सहाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. धाराशिव पोलिसांच्या समन्वयपूर्ण तपासामुळे या प्रकरणाच्या उलगड्याला निर्णायक गती मिळाली.

धूळे जिल्ह्यातील नरव्हाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गालगत असलेल्या निर्जन वनक्षेत्रात 22 सप्टेंबर रोजी एका महिलेचा गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या महिलेचा मारहाण करून खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे तपासात समोर आले. वैद्यकीय तपासणीत मृत महिला गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मृत महिलेची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृत महिला पिंकी हनुमंत काटकर (वय 31, मूळ रा. रायगड) असून, ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रात नर्तिका म्हणून कार्यरत होती. या प्रकरणात कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून तिचा खून झाल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

धुळे पोलिसांची मदत मागताच धाराशिव एलसीबी सक्रिय

या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी 25 सप्टेंबर रोजी मोहाडीनगर पोलिसांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडे मदत मागितली. त्यावेळी धुळे पोलिसांकडे केवळ एका संशयित आरोपीचे नाव उपलब्ध होते. ही बाब लक्षात घेऊन धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने तपास सुरू केला.

 ठाणे गुन्हे शाखा धाराशिव व धुळे पोलिस यांच्या विशेष पथकाला उपलब्ध माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत जामखेड येथील सप्तसूर कला केंद्रापर्यंत धडक मारली. तेथून सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (वय 38), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (वय 31), लक्ष्मी बालाजी पवार (वय 30) आणि स्वाती ऊर्फ आरती गणेश कुराडे या चार आरोपींना ताब्यात घेतले. तसेच मृत महिलेची ओळख पटविण्यातही धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी या चारही आरोपींना धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कळंब पोलिसांचा सापळा; फरार दोघे जेरबंद

या गुन्ह्यातील फारुख हजु शेख (वय 29, मूळ रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय 26, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फरार होते. त्यांचा शोध सुरू असतानाच कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख यांना 27 सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

दोन्ही फरार आरोपी कळंब येथून केज रोडच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर आणि त्यांच्या पथकाने केज रोडवरील 7/12 हॉटेलसमोर सापळा रचला. यावेळी दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांची खात्री करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना मोहाडीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कळंबमध्ये बेवारस कारही जप्त

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची होंडा मोबिलिओ कार आरोपींनी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. कारची नंबर प्लेट काढण्यात आली होती. मात्र, तिचा क्रमांक MH 43 AR 4070 असल्याचे समोर आले. ही कार कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर कळंब पोलिसांनी ती ताब्यात घेतली आणि पुढील तपासासाठी मोहाडीनगर पोलिसांकडे सुपूर्द केली.

धाराशिव पोलिसांच्या समन्वयातून तपासाला गती

गर्भवती महिलेचा खून करून सुमारे 275 किलोमीटर दूर नेऊन तिचा मृतदेह जाळण्याच्या या गंभीर गुन्ह्यात सुरुवातीला मृत महिलेची ओळख आणि आरोपींचा शोध ही दोन प्रमुख आव्हाने होती. धुळे पोलिसांकडे सुरुवातीला मर्यादित माहिती असताना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. जामखेडमधून पहिल्या चार आरोपींना ताब्यात घेणे, मृत महिलेची ओळख पटविण्यास मदत करणे आणि त्यानंतर कळंब पोलिसांनी उर्वरित दोन फरार आरोपींना पकडणे, या संपूर्ण कारवाईत धाराशिव जिल्हा पोलिसांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण आणि नागनाथ गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच कळंब पोलिसांच्या पथकाने फरार आरोपींना पकडून गुन्ह्यातील वाहनही जप्त केले.

धुळे जिल्ह्यात घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून केलेली कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेचा तपास आणि कळंब पोलिसांनी केलेली अचूक कारवाई यामुळे सहाही आरोपींना अटक करण्यात यश आले. या प्रकरणाच्या उलगड्यात धाराशिव पोलिसांनी बजावलेली भूमिका विशेष महत्त्वाची ठरली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

औसा-भिवंडी बससेवेला धाराशिव आगाराची जोड;

Next Post

धाराशिव सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
क्राईम

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

September 22, 2026
Next Post
धाराशिव सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

धाराशिव सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!