• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 27, 2026
in राजकारण
0
नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
0
SHARES
344
VIEWS

एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’ ! नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

‘निष्ठा विकली’च्या आरोपांनी खळबळ

धाराशिव लोकविचार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक संतोष उर्फ नाना घाटगे यांच्या सह चार नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेला अचानक पूर्णविराम देत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, शहरातील सुशिक्षित, साक्षर आणि व्यावसायिक मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ अर्थात समता कॉलनी परिसरात या पक्षप्रवेशाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही तासांतच परिसरात झळकलेल्या बॅनरमुळे या राजकीय घडामोडीला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

या बॅनरवर ‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’ हा मजकूर ठळकपणे मांडण्यात आला आहे. त्यासोबतच ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’, ‘क्लीन समताचा दाढीवाला बोका’, ‘प्रभाग क्रमांक ९ चे उभाठा नगरसेवक आमचे मत आम्हाला परत द्या’ अशा अत्यंत आक्रमक शब्दांत आरोप करण्यात आले आहेत.तसेच ‘सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, घेऊन एक कोटी निष्ठा विकली’ असा गंभीर आरोपही बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

या मजकुरामुळे पक्षांतरामागे नेमके काय राजकारण झाले, याबाबत स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे, बॅनरवर प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकाचे नाव थेट न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणेही या निमित्ताने चर्चेत आली आहेत.निवडणुकीत ज्या मतदारांनी विश्वास ठेवून प्रतिनिधित्वाची संधी दिली, त्याच मतदारसंघात पक्षबदलानंतर अशा पद्धतीने बॅनर झळकणे ही निश्चितच लक्षवेधी बाब मानली जात आहे.

विशेषतः सुशिक्षित आणि जागरूक मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता कॉलनीत या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बॅनरवरील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

मात्र ‘एक कोटीचा गद्दार’ आणि ‘निष्ठा विकली’ या घोषणांनी धाराशिवच्या राजकारणात पक्षांतराचा मुद्दा चांगलाच तापला असून, या बॅनरबाजीमागे नेमके कोण आणि यामागील राजकीय संदेश काय, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरगद्दारतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव नगरसेवकपक्षप्रवेशपक्षांतरराजकारणशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

Next Post

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

Related Posts

राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?
राजकारण

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

August 16, 2026
Next Post
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!