• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
20
VIEWS

‘एक कोटीचा दाढीवाला गद्दार’! नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी; ‘निष्ठा विकली’च्या आरोपांनी खळबळ

धाराशिव लोकविचार

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक संतोष उर्फ नाना घाटगे यांच्या सह चार नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेला अचानक पूर्णविराम देत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, शहरातील सुशिक्षित, साक्षर आणि व्यावसायिक मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ अर्थात समता कॉलनी परिसरात या पक्षप्रवेशाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही तासांतच परिसरात झळकलेल्या बॅनरमुळे या राजकीय घडामोडीला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

या बॅनरवर ‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’ हा मजकूर ठळकपणे मांडण्यात आला आहे. त्यासोबतच ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’, ‘क्लीन समताचा दाढीवाला बोका’, ‘प्रभाग क्रमांक ९ चे उभाठा नगरसेवक आमचे मत आम्हाला परत द्या’ अशा अत्यंत आक्रमक शब्दांत आरोप करण्यात आले आहेत.

तसेच ‘सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, घेऊन एक कोटी निष्ठा विकली’ असा गंभीर आरोपही बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या मजकुरामुळे पक्षांतरामागे नेमके काय राजकारण झाले, याबाबत स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, बॅनरवर प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकाचे नाव थेट न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणेही या निमित्ताने चर्चेत आली आहेत.

निवडणुकीत ज्या मतदारांनी विश्वास ठेवून प्रतिनिधित्वाची संधी दिली, त्याच मतदारसंघात पक्षबदलानंतर अशा पद्धतीने बॅनर झळकणे ही निश्चितच लक्षवेधी बाब मानली जात आहे. विशेषतः सुशिक्षित आणि जागरूक मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता कॉलनीत या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बॅनरवरील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र ‘एक कोटीचा गद्दार’ आणि ‘निष्ठा विकली’ या घोषणांनी धाराशिवच्या राजकारणात पक्षांतराचा मुद्दा चांगलाच तापला असून, या बॅनरबाजीमागे नेमके कोण आणि यामागील राजकीय संदेश काय, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरतुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव नगरसेवकपक्षप्रवेशफोडाफोडीभाजपाराजकारणशिवसेना
Previous Post

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

Next Post

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!