• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 17, 2026
in राजकारण
0
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
0
SHARES
46
VIEWS

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला! आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

धाराशिव लोकविचार तालुक्यातील घाटंग्री येथील बौद्ध समाजाचे विकास अंकुश आणि त्यांच्या पत्नी रेखा अंकुश यांच्यावर अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात भूमिका मांडल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि पीडित दांपत्याला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामीण पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.धमक्या देऊन लोखंडी रॉडने मारहाणमिळालेल्या माहितीनुसार, अंकुश दांपत्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात न बोलण्यासाठी धमकावण्यात आले. तसेच “जय लहुजी, जय अण्णा” अशा घोषणा देण्यास जबरदस्ती करण्यात आली. या जबरदस्तीला विरोध केला असता नितीन शहाजी देडे, आतिश मधुकर देडे, बबलू युवराज कांबळे आणि प्रेम बल्लाळ यांनी विकास व रेखा अंकुश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.निवेदनातील मुख्य मागण्या :निष्पक्ष चौकशी व कठोर गुन्हे : पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे पुरावे आणि उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत.पारदर्शक कारवाई : कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक प्रभावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शकपणे पावले उचलावीत.तत्काळ पोलीस संरक्षण : पीडित अंकुश दांपत्याच्या जीवितास गंभीर धोका असल्याने प्रशासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे.तीव्र आंदोलनाचा इशारासंविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. वैचारिक मतभेदांमधून हिंसाचार करणे हे लोकशाहीला घातक असून, प्रशासनाने या प्रकरणात टाळाटाळ किंवा दिरंगाई केल्यास धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मा .जिल्हा संघटक विकास बनसोडे,आरपीआय(खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव भाई फूलचंद गायकवाड (पाटील) आरपीआय (आठवले) जिल्हाउपाध्यक्ष संदिपान कांबळे,बापूराव गायकवाड, नेताजी लोंढे, उमाजी गायकवाड, अण्णाराव कांबळे, बळीराम बनसोडे व शिवदर्शन गव्हाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआंदोलनआमदार कैलास पाटीलआरक्षण उपवर्गीकरणजातीवादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमहा मोर्चामहाराष्ट्रसमाजकंटक
Previous Post

“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

Next Post

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ - पालकमंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!