• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 14, 2026
in क्राईम
0
कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
34
VIEWS

कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कळंब लोकविचार

कळंब शहरातील प्रभात लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यवसायावर कळंब पोलिसांनी धाड टाकत दोन महिलांची सुटका केली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने १३ जुलै रोजी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविली होती.

गस्ती दरम्यान पोलीस निरीक्षक शकील शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत प्रभात लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास लॉजवर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. महिलांची चौकशी केली असता आरोपी समाधान महादेव कांबळे (रा. इंदिरानगर, कळंब), अमोल राजाभाऊ सोनटक्के (वय ३६, रा. हासेगाव, ता. कळंब) आणि नरेश खेमराज जोशी (रा. बसस्थानकासमोर, कळंब) यांच्या सांगण्यावरून त्यांना व्यावसायिक उद्देशाने आश्रय देऊन लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याची माहिती समोर आली. तसेच आरोपी या व्यवसायातून स्वतःची उपजीविका करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदवही (रजिस्टर), रोख ६,२०० रुपये आणि निरोधाची पाकिटे असा एकूण १६,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक २९८/२०२६ अन्वये बीएनएसच्या कलम १४३(३), १४४(२) तसेच मानवी अनैतिक व्यवसाय (प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३, ४, ५ व ६ अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

Next Post

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!