• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 8, 2026
in शिक्षण
0
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
0
SHARES
28
VIEWS

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

धाराशिव Lokvichar – लोकविचार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयावर शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून विद्यार्थ्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जादा फी आकारून सुमारे २५ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित विभागांकडे निवेदन देऊन तातडीने चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, शासन निर्णयानुसार अध्यापक विद्यालयाची वार्षिक ट्युशन फी ₹3,300 असताना प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून ₹6,500 शुल्क आकारण्यात आले. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याकडून ₹3,200 अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप आहे. दरवर्षी सुमारे 100 विद्यार्थ्यांकडून ही रक्कम घेतली गेल्याने गेल्या आठ वर्षांत सुमारे ₹25 लाखांची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच अतिरिक्त फी रोखीने स्वीकारून विद्यार्थ्यांना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही, असा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अनुदानित संस्था असूनही शासनाच्या शुल्क नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा तसेच रोख व्यवहारांमुळे कर यंत्रणेचीही दिशाभूल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात संस्थेची मान्यता व अनुदान रद्द करावे, संस्था चालक व प्रभारी प्राचार्यांविरुद्ध IPC कलम 420 व 120(B) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा, विद्यार्थ्यांकडून जादा वसूल केलेली सुमारे ₹25 लाखांची रक्कम व्याजासह परत करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची CID किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन शिक्षण आयुक्त, पुणे, जिल्हाधिकारी धाराशिव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), SCERT संचालक आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्यासह संबंधित विभागांना सादर करण्यात आले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

Next Post

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
शिक्षण

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 27, 2026
आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे
शिक्षण

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

June 16, 2026
नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
शिक्षण

नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!