• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 8, 2026
in महाराष्ट्र
0
२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
7
VIEWS

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

 मुंबई लोकविचार 

पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य परिणय फुके, सतेज पाटील, प्रविण दरेकर, भावना गवळी, निरंजन डावखरे, उमा खापरे, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, चंद्रकांत रघुवंशी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

            मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार केला असून, त्यापैकी ९०० हून अधिक बस महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. या बसेस यशस्वीपणे प्रवासी सेवा देत आहेत. या करारानुसार राज्यात १७२ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३९ चार्जिंग स्टेशन पूर्ण झाली असून, आणखी ४५ स्टेशन पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होतील. उर्वरित स्टेशनही लवकर पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ संबंधित कंपनीशी समन्वय साधत आहे. एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याचे सांगत आतापर्यंत २०० हून अधिक खासगी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. सध्या कार्यरत बससह नव्याने खरेदी होणाऱ्या बसचा समावेश या योजनेत करण्यात येणार असून, जुन्या बसचेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र हे संपूर्ण इलेक्ट्रिक एसटी ताफा असलेले देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

            ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. बस डेपो आणि बसपोर्टचे आधुनिकीकरण, चालक-वाहकांसाठी निवास व्यवस्था तसेच आवश्यक सुविधांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

Next Post

दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!