• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 8, 2026
in महाराष्ट्र
0
दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
0
SHARES
23
VIEWS

दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

धाराशिव Lokvichar – लोकविचार

लोहारा तालुक्यातील मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जागेवरील भूमिहीन लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरांचे मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाला) तात्काळ देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ऑल इंडिया फकिरा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास दिनांक ९ जुलै रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जमीन सन १९६५ मध्ये भूमिहीनांसाठी शासनाने संपादित केली होती. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यात आली. मात्र आजतागायत या लाभार्थ्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र (कबाला) देण्यात आलेले नाही.या प्रकरणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यात आवश्यक सुधारणा करण्यात आली असून जमीन कमी करण्यात आली आहे.

तसेच शासकीय मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात आल्या असून अधिकृत मोजणी नकाशाही उपलब्ध झाला आहे. तरीही मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायतीच्या अभिलेखात जमीन नोंदविण्यात आलेली नसल्याने लाभार्थ्यांना मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे गट क्रमांक ९८ मधील २५ आर जागेची ग्रामपंचायतीच्या नोंदीत तात्काळ नोंद करून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरांचे मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्या नेतृत्वाखाली नागीन थोरात (मराठवाडा अध्यक्ष), पार्वती झुंजारे, अलकाबाई लोंढे आणि शिवाबाई झुंजारे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि सामूहिक आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectorLokvicharosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – इरफान हाजी उस्मान कुरेशी

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा –  इरफान हाजी उस्मान कुरेशी

धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा - इरफान हाजी उस्मान कुरेशी

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!