• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – इरफान हाजी उस्मान कुरेशी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 8, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा –  इरफान हाजी उस्मान कुरेशी
0
SHARES
231
VIEWS

धाराशिव बस स्थानकात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – इरफान हाजी उस्मान कुरेशी

धाराशिव लोकविचार

धाराशिव बस स्थानकातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे अतिरीक्त सुरक्षारक्षक व साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक इरफान उस्मान कुरेशी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन धाराशिव विभागाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.८ जुलै रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव बस स्थानकात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज एक-दोन चोरीच्या घटना घडत असून सोन्याचे दागिने, मोबाईल, पर्स तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. विशेषतः बसमध्ये चढताना किंवा गर्दीच्या वेळी चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी ते अपुऱ्या संख्येने असून अनेक प्लॅटफॉर्मवर कॅमेरेच उपलब्ध नाहीत. काही कॅमेरे योग्य ठिकाणी बसवलेले नसल्यामुळे चोरीच्या घटनांचे स्पष्ट चित्रीकरण होत नाही. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे कठीण जात आहे. तसेच बस स्थानकात नियुक्त सुरक्षारक्षक अनेकदा त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहेत.

विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी महिला व जेष्ठ नागरिक हे चोरट्यांचे सहज लक्ष्य ठरत आहेत. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने प्रत्येक बस स्थानकातील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. सध्या असलेले सीसीटीव्ही यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे पुनर्स्थापित करण्यात यावेत.

बस स्थानकात अतिरिक्त सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करून त्यांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यात यावी‌. चोरीच्या घटनावर प्रभावी यंत्रणा मिळवण्यासाठी पोलीस विभागामार्फत साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती व स्थानक परिसरात नियमित गस्त वाढवून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा योजना कराव्यात.

विशेष म्हणजे धाराशिव बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्रशासनात जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची दखल घेऊन तात्काळ आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निर्माण कुरेशी व जैनोद्दीन मुजावर यांनी केली आहे.Lokvichar –

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Next Post

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!