• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 4, 2026
in कृषी
0
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
0
SHARES
6
VIEWS

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

धाराशिव Lokvichar – लोकविचार

धाराशिव जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाहणी दौऱ्यावर असलेल्या आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी कळंब तालुक्यातील भोगजी, बहुला आदी भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी सुरू केली आहे. अनेक गावांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढताच गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे नव्याने उगवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार कैलास पाटील यांनी पाहणी दौऱ्यातूनच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांचे वाढते नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर कृषिमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यापुढे ज्या क्षेत्रात पेरणी होणार आहे, त्या ठिकाणीही गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही आमदार कैलास पाटील यांनी दिल्या.

यावेळी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post
श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार

श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार - पुजार

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!