• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तथाकथित समाजसेवकाकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 8, 2026
in क्राईम
0
तथाकथित समाजसेवकाकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात
0
SHARES
524
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तथाकथित समाजसेवक समाजसेवकांकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात समाजसेवक असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उमरगा तालुक्यातील एका व्यक्तीवर मेंढा गावातील नागरिकांकडून रेशन कार्ड काढून देतो, असे सांगून ५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर तहसीलदार मृणाल जाधव यांनी तात्काळ दखल घेत संबंधित व्यक्तीस चौकशीसाठी तहसील कार्यालयात थांबवून ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेंढा गावात नागरिकांकडून पैसे घेताना किरकोळ बाचाबाची झाल्याचीही चर्चा आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित व्यक्ती स्वतःला समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेत होता. तसेच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या फोटोसेशनचा वापर करून त्या फोटोंच्या आधारे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अतिवृष्टी व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देतो, असे सांगत अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचीही माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात एनसी (NC) दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीने इतर किती नागरिकांची फसवणूक केली आहे याचा सखोल तपास सुरू असून तक्रारदारासही समोरासमोर चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.

तहसीलदार मृणाल जाधव यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित व्यक्तीविरोधात इतर ठिकाणीही फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत पोलिसांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात प्रशासनात खळबळ उडाली असून महसूल प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतहसीलदार धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

Next Post

तहसीलदारांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा भामटा जाळ्यात

Next Post
तहसीलदारांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा भामटा जाळ्यात

तहसीलदारांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा भामटा जाळ्यात

Recent Posts

  • जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.