• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लोकमदत न्यूजचा दणका! अखेर लोकवस्ती नसलेल्या भागातील बोगस पाईपलाईन उखडण्यास सुरुवात नगराध्यक्षांचे ठेकेदाराला खडे बोल!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 4, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकमदत न्यूजचा दणका! न.प. हद्दीतील निर्जन भागातील बोगस पाईपलाईन उखडण्यास सुरुवात सत्ताधाऱ्यांचे ठेकेदाराला खडे बोल

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील पाणीपुरवठा घोटाळ्याचा पर्दाफाश करत लोकमदत न्यूजने 27 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. निर्जन भागात टाकण्यात आलेली लाखो रुपयांची पाईपलाईन आता काढून घेण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, संबंधित ठेकेदारावर कारवाईची तलवार लटकली आहे.
शहरात नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना जाधववाडी रोड परिसरातील निर्जन ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर नगराध्यक्ष नेहा काकडे, गटनेते अमित शिंदे आणि पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनी पाणीपुरवठा अभियंता यांना तात्काळ संबंधित ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. “ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही, तेथे पाईपलाईन टाकण्याची आवश्यकता नाही; अशा ठिकाणची लाईन तात्काळ काढून घ्या आणि जिथे प्रत्यक्ष गरज आहे तिथेच प्राधान्याने काम करा,” असे सक्त निर्देश देण्यात आले होते.
या आदेशांची अंमलबजावणी करत पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देत ठेकेदाराला चांगलेच खडे बोल सुनावले. “लोकवस्ती नसताना इतक्या आतपर्यंत पाईपलाईन टाकण्यामागचा उद्देश काय?” असा जाब विचारत त्यांनी तत्काळ पाईपलाईन काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदाराने संबंधित पाईपलाईन उखडण्याचे काम सुरू केले आहे, मात्र हे पाईपलाईन करण्याचे काम फक्त फोटो पूर्ण काढून घेण्यात यावी अन्यथा परत एकदा ठेकेदाराकडून सत्ताधाऱ्यांची दिशाभूल तर करून पाईपलाईन जसे राहणार तर नाही ना असा देखील आता प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण व संगनमताचा संशय अधिक गडद झाला असून, लोकमदत न्यूजच्या बातमीमुळे या प्रकरणाला मोठी गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्येही या कारवाईचे स्वागत होत असून, “ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गरज आहे तिथेच काम व्हावे,” अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.
तसेच, संबंधित ठेकेदाराने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर ठिकाणी बोगस पाईपलाईन टाकली का? कोणाच्या आदेशाने ही कामे झाली? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे संकेत असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, लोकमदत न्यूजने उचललेल्या आवाजाला अखेर न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज
“सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक : अमजद सय्यद 8390088786

Previous Post

66 लाखांचा टेम्पो भर दुपारी बेपत्ता मात्र तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल, प्रकरणावर संशयाचे सावट!

Next Post

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.