• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोकमदत न्यूजचा पुन्हा दणका! धाराशिव बसस्थानकात ‘पास लूट’ पूर्णपणे बंद नवीन मशीनद्वारे पारदर्शक सेवा लवकरच ज्येष्ठ व दिव्यांगांकडून समाधान व्यक्त

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 2, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

लोकमदत न्यूजचा पुन्हा दणका! धाराशिव बसस्थानकात ‘पास लूट’ पूर्णपणे बंद
विभागीय नियंत्रक अजय पाटील यांची कठोर भूमिका एजन्सीवर कारवाईचा बडगा!

नवीन मशीनद्वारे पारदर्शक सेवा लवकरच ज्येष्ठ व दिव्यांगांकडून समाधान व्यक्त

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांकडून पासेसच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक लुटीचा पर्दाफाश लोकमदत न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने केवळ काऊंटर बंद करण्यापुरती मर्यादा न ठेवता, संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ठोस पाऊल उचलले आहे. विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे हा प्रकार पूर्णपणे थांबवण्यात यश आले असून प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दि. १ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये ‘199 रुपये’ शुल्क असताना 230 ते 250 रुपये वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात एजन्सी व दलालांचा मनमानी कारभार, तसेच पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकारही समोर आले होते. यानंतर प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढताच तातडीने संबंधित काऊंटर बंद करण्यात आला.
विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संबंधित काऊंटर पूर्णपणे बंद असून पुढील दोन दिवसांत नवीन मशीनद्वारे पारदर्शक पद्धतीने पास वितरण सुरू करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारची जादा वसुली होऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
यासोबतच, परिवहन विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी स्थानक प्रमुखांवर सोपविण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखालीच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना पास वितरण केले जाणार आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आयडी व पास वितरण प्रक्रियेत वारंवार अनेक तक्रारी येत असल्याने संबंधित आयडी धारकांना ‘काळ्या यादीत’ टाकण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि तत्पर कारवाई यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांची सुरू असलेली लूट थांबली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, लोकमदत न्यूजच्या वृत्ताची प्रभावी दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे तसेच माध्यमांचे आभार व्यक्त केले असून, भविष्यातही अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

कामगारच ठरला दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४२  हजारांच्या मुद्देमालासह  २ आरोपी जेरबंद

Next Post

नळदुर्गमध्ये गुटखा तस्करीचा भंडाफोड! ‘मकोका’ची मागणी मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार!..

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

नळदुर्गमध्ये गुटखा तस्करीचा भंडाफोड! ‘मकोका’ची मागणी मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार!..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!