• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर        

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर                

धाराशिव लोकमदत न्यूज


सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील प. सा. नाट्यमंदिर, टिळक पथ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          यापूर्वी या पुरस्काराने महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते व लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. आबा पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब कुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चुभाऊ कडू, नीलमताई गोरे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, नितीन गडकरी, भारतीताई पवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.

समाजवादी विचारांचे अध्वर्यू स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संसदीय कार्यातील सक्रियता, जनतेच्या प्रश्नांबाबत सातत्याने मांडलेला आवाज आणि विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची





दखल घेऊन प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई हिरे, महापौर हिमगौरी आडके, प्रा. दिलीपराव फडके, सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधने, सचिन महाजन, शोभाताई नेरलिनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारताना मिळालेली ₹५०,००० ची रोख रक्कम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्याच क्षणी सार्वजनिक वाचनालयाला परत अर्पण केली. ज्ञान, विचार आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा, समाजात बौद्धिक जागरूकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने वाचनालये कार्यरत असतात. त्या ज्ञानपरंपरेला आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला आपल्या कडून छोटासा हातभार लागावा, या भावनेतून त्यांनी ही रक्कम वाचनालयाला अर्पण केली.

हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून धाराशिवच्या जनतेचा सन्मान असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासामुळेच आपण संसदेत पोहोचलो असून त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडत विकासासाठी अधिक जोमाने कार्य करत राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

बांधकाम कामगार योजनांतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का?

Next Post

रस्ते, कॉम्प्लेक्स, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी हतबल!.

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

रस्ते, कॉम्प्लेक्स, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी हतबल!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!