• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

दैनिक लोकमदत न्यूजच्या दणक्याने अखेर नगर परिषदेला आली जाग, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला, १३ फेब्रुवारीला बैठक निश्चित

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 11, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दैनिक लोकमदत न्यूजच्या दणक्याने अखेर नगर परिषदेला आली जाग, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला, १३ फेब्रुवारीला बैठक निश्चित

धाराशिव – लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी देखील जनतेने नगर परिषदेच्या खुर्चीवर बसविलेल्या व कारभार हाकणाऱ्या सत्ताधारी मंडळींना शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा घेण्याचा विसर पडला होता. त्यामुळे शहरातील प्रश्न जैसे थे रखडले होते. या संदर्भात लोकमदत न्यूजमध्ये दि. ७ फेब्रुवारी रोजी….नगर परिषदेची सर्वसाधारण सभा न घेतल्यामुळे समस्या जैसे थे !…..शहरातील विकास कामांच्या नावाने चांगभलं !…. या मथळ्याखाली व्रत प्रसिद्ध करताच झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी मंडळींनी खडखडून जागे झाल्याचा आव आणत दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. तसे पत्र दि.०९ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी काढले आहे. त्यामुळे शहरवासियांच्या समस्यांना वाचा फुटण्यास मदत झाली आहे. तर याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन विस्मरणात गेलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे केल्यामुळे लोकमदत न्यूजचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकमदत न्यूजमध्ये दि.७ फेब्रुवारी रोजी कुरघोडीचे राजकारण आणि विकासाला खोडा हे धाराशिव शहराचे समीकरण बनलेले आहे. या प्रकारामुळे अगोदरच धाराशिव शहराचा आणि विकास कामांचा खेळ खंडोबा झालेला आहे. पूर्वीचे सत्ताधारी काम करत नसल्याचा आरडाओरड करत त्यांच्या नावाने बोंबाबोंब केली जात होती. सत्ता बदल होऊन दीड महिन्याचा कालावधी गाठत आला आहे. आमच्या हाती सत्ता द्या, आम्ही लागलीच विकास कामांना प्रारंभ करणार असल्याचा दिंडोरा पिटला जात होता. विशेष म्हणजे विकास कामे करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा घेणे कायद्याने अनिवार्य आणि बंधनकारक आहे. मात्र, ती सभा घेण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या व्युहरचनेतून फुरसत नाही. त्यामुळे त्या सभेत कोणते विषय घ्यायचे ? हे ठरवता आलेले नाही. ती पहिलीच सर्वसाधारण सभा अद्यापपर्यंत न घेतल्यामुळे शहरातील स्वच्छता, रस्ता दिवाबत्ती आणि इतर कोणत्याच विकास कामांना प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे शहरातील गल्ल्यांसह रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावरील बंद असलेली लाईट व तुंबलेल्या नालीतील घाण पाण्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष व विषय समिती सभापती यांनी आपल्या खुर्चीवर बसण्यात व घेतलेले सर्वसिधारण…सभा…न घेता…’पद’….मिरविण्यात धन्यता मानली असल्यामुळे शहरवासियांमध्ये सत्ताधाऱ्या विरोधात तीव्र असंतोष खदखदत असून बोंबाबोंब मारण्यास सुरुवात झाली आहे. हे वास्तविक वृत्त प्रसिद्ध करताच झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी मंडळींनी लागलीच नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याची तारीख निश्चित केली आहे.

दि.१३ फेब्रुवारी रोजी या विषयांवर होणार चर्चा आणि निर्णय घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मागील सभेचा वृत्तांत वाचून तो कायम करणे नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता करा वरील शास्ती अंशतः पूर्णतः माफ करून कर वसूल करण्यासाठी तसेच मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.
स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफी योजनेअंतर्गत मालमत्ता करामध्ये सूट देण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे स्वतंत्र सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर योजनेअंतर्गत मालमत्ता करामध्ये सूट देण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे केंद्र शासनाचा दूरसंचार कायदा 2023 व दूर संचार नियम च्या विचार विनिमय करून निर्णय घेणे धाराशिवनगर परिषद हद्दीतील पथदिवे देखभाल दुरुस्ती तसेच नवीन एलईडी पथदिवे पुरवठा करणे या कामासाठी करारनामा करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे रमाई आवास योजनेसाठी नवीन तांत्रिक सल्लागार नेमणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे नगर परिषदेकडे दैनंदिन कचरा संकलन निविदेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे शहरातील कचरा डेपो असलेल्या ठिकाणाच्या कचऱ्याचे सहा महिन्यात विघटन करणे व कचरा डेपो स्थलांतरित करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे शहरांमध्ये रीट पिटेशन १५५ / २०११ अनधिकृत डिजिटल बॅनर पोस्टर लावणे बाबत नियमांचे पालन होत नसल्याने सदर कामे विचार विनिमय करून निर्णय घेणे, नगर परिषदेकडे जेसीबी तसेच ठेकेदाराकडे वापरात असलेल्या घंटागाड्या इत्यादी वाहने दुरुस्त करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे शहरातील डुकरांचा बंदोबस्त करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे न्यायालयाच्या आदेशान्वये ऍनिमल बर्थ कंट्रोल नियमांची अंमलबजावणी करून शहरातील भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करणे कामी निविदा प्रस्तावित करून विचार विनिमय करून निर्णय घेणे
कायदेविषयक सल्लागार यांची नेमणूक करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे सुधारित आकृती बंद प्रस्ताव शासनास पाठविणे बाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी प्रस्ताव पाठविणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे, वारस हक्काने सेवेत नियुक्ती देणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे,
विविध विकास कामांकरिता नगरपरिषदेच्या पॅनलवर सल्लागार अभियंता नेमणूक करणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे
पोलीस लाईन धाराशिव येथे उद्यान निर्मिती करणे तसेच या उद्याना सोबत नमो उद्यानासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे बाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत प्रस्ताव पाठविणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.
प्रलंबित कामांच्या निविदावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट

Next Post

…तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाशिवाय सत्ता स्थापन करणार.! आ. तानाजीराव सावंत ठरणार का ‘किंगमेकर’?

Next Post

...तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाशिवाय सत्ता स्थापन करणार.! आ. तानाजीराव सावंत ठरणार का ‘किंगमेकर’?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.