• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा  पंचसूत्री आराखडा तयार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 14, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा  पंचसूत्री आराखडा तयार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसचे उत्पन्न वाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करीत, सुधारणा ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केला असल्याची विशेष माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई येथील मंत्रालयातील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. तर एसटीच्या व्यवस्थापनासाठी दररोज सकाळी १० वाजता आगारात, ११ वाजता विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दरम्यान आगार, विभाग व प्रदेश स्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  तसेच – डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक आहे. त्यामुळे KPTL अर्थात प्रती किलो मीटर १० लीटर असे चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. विशेष म्हणजे KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले असल्याची मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच
तिकीट विक्री ही महसुलाची जीवन वाहिनी असल्यामुळे वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM अर्थात संचित प्रती किलो मीटर उत्पन्न या प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर एसटीचे वेळापत्रक हा वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच  राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच
१ जानेवारीला बस स्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८० टक्क्यांपेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे अशा अनेक सुधारणा लांब व मध्यम पल्ल्यांच्या व्यवस्थापनामध्ये होत आहेत. तर ऑनलाईन व मोबाईल ॲपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. तसेच
स्वच्छ व टापटीप बस स्थानके, प्रसाधन गृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका - तानाजी जाधवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!