• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम : नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 19, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम : नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२५ या कालावधीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला विशेष सामाजिक परिमाण लाभावे, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘नऊ दिवस – नऊ सन्मान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दररोज एका महिलेला अशा प्रकारे नवरात्र उत्सव काळात एकूण नऊ महिलांना गौरविण्यात येणार आहे. महिलांची निवड करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने खालील नऊ महिलांची निवड केली आहे –

१) अस्मिता अविनाश सूर्यवंशी, रा. गुंजोटी ता. उमरगा – शेवया उत्पादक गटात नावलौकिक, तसेच ‘घे भरारी’ टीव्ही शो विजेत्या.
२) बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण, रा. अणदूर ता. तुळजापूर – बालविवाह प्रतिबंध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य.
३) अनिता नामदेव देवकते, रा. सौंदणा आंबा ता. कळंब – आवळा उत्पादने निर्मिती, प्रेरणादायी एकल महिला यशोगाथा.
४) प्रियंका रघुवीर पासले, रा. तीर्थ ता. तुळजापूर – विविध उपजीविका उपक्रम आणि संघर्षमय प्रवास.
५) सारिका रामेश्वर येळेकर, रा. बेंबळी ता. धाराशिव – शेळीपालन क्षेत्रात कार्य.
६) रोहिणी धीरज सुरवसे, रा. वाखरवाडी ता. धाराशिव – शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे केला.
७) नंदा राजेश जगताप, रा. वाघेगव्हाण ता. परांडा – मासिक पाळी व्यवस्थापन व पोषण परसबाग याबाबत जागृती.
८) वैशाली जाधव, रा. गणेगाव ता. भूम – एकल महिला सक्षमीकरणासाठी काम.
९) लक्ष्मी कल्याण मोरे, रा. बेंडकाळ ता. लोहारा – सेंद्रिय शेती प्रचार व प्रसार क्षेत्रात योगदान.

याशिवाय, या महोत्सवात पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक व संवर्धक पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी असलेल्या राहीबाई पोपेरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून देशी बियाण्यांची बँक सुरू केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच बीबीसीने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला होता.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या सन्मानामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रेरणा मिळणार आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदtuljapur तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा न्यायालयआई तुळजाभवानीआई राजा उदो उदोआमदार राणाजगजितसिंह पाटीलतुळजापूरतुळजाभवानीभवानी ज्योतश्री क्षेत्र तुळजाभवानी
Previous Post

धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजरा

Next Post

पंचायत समित्यांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा – बालाजी जावळे

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

पंचायत समित्यांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा – बालाजी जावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!