• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जन सुनावणी घ्यावी – खा.ओमराजे निंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामकाजावरून पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याची व नागरिकात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरिता सांस्कृतिक मंत्री नामदार आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जनसुनावणी घ्यावी अशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मागणी केली आहे.
    यापूर्वीच्या आमदारांनी तुळजापूर विकास प्राधिकरण सुरू करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. यात्रेसाठी अनुदान मिळवून दिल्याचे श्रेयही त्यांनाच जाते. मात्र, तुळजाभवानी मंदिराचे उत्पन्न नाही विद्यमान आमदारांनी मात्र हे पाऊल उचलून विकास आराखड्यास चालना दिल्याचे स्पष्ट दिसते.असा उपरोधिक टोला हे यावेळी खासदार ओमराजे यांनी यावेळी लगावला. श्री क्षेत्र तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ असून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असून कुलस्वामिनी तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्याने तुळजाभवानी मंदिराच्या जिर्णोद्धारास विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.
           दरम्यान, राणा पाटील यांनी “तुळजापूरची बदनामी महायुतीने की महाविकास आघाडीने केली” असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावरून त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठकीची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीच्या पत्रकात पालकमंत्री व खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु नंतर सुधारित पत्र काढून त्यांना दूर ठेवण्यात आले.
   खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुळजापूर विकास प्राधिकरण कडून विकास कामाच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या परंतु केवळ त्या हरकती नोंदवून घेण्यात आल्या तसेच या हरकती वरती कोणतीही जन सुनावणी घेण्यात आली नाही अथवा संबंधितांना लेखी स्वरूपात कळविले गेले नाही यावर देखील प्रकाश टाकला तुळजापूर विकासाच्या नावाखाली सोंग घेणाऱ्यांचा बुरखा फाडत त्यांनी “पालकमंत्री व लोकप्रतिनिधी हे संवैधानिक पदावर कार्यरत आहेत. ते जनतेमुळेच आहेत, कोणाच्या मर्जीमुळे नाहीत,” असे स्पष्ट करून राजकीय षड्यंत्रकर्ते कोन आहेत ते सप्रमाण दाखवून दिले.
       या सर्व घडामोडींमध्ये तुळजापूर शहरातील नागरिक, व्यापारी व पुजारी समाज संभ्रमित झाले आहेत. विकास आराखडा त्यांच्या हितासाठी आहे की राजकीय स्वार्थासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या संभ्रमाचा निकाल लावण्यासाठी तुळजापूर येथे जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
   तुळजापूर विकास हा सर्वांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यात्रेचे धार्मिक व सांस्कृतिक , ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथील विकास आराखडा शाश्वत आणि लोकाभिमुख असणे आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे बैठकीतून खासदार व पालकमंत्र्यांना वगळणे ही लोकशाही पद्धतीला शोभणारी बाब नाही.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पुजारी यांच्या भावनांचा विचार न करता केवळ कोणा एका व्यक्तीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले तर त्यातून फक्त अविश्वास, नाराजी वाढेल. त्यामुळे आता खरोखरच गरज आहे ती पारदर्शक जनसुनावणीची, ज्यातून सर्व घटकांना आपले मत मांडण्याची संधी मिळेल. विकास हा सामूहिक जबाबदारीचा विषय असून, तो राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकवणे ही तुळजापूरच्या हिताची बाब ठरणार नाही.
यावेळी आमदार कैलास पाटील, ऋषी मगर, राजाभाऊ शेरखाने, महेबुब पटेल, सुधीर कदम आदी उपस्थील होते  

Tags: dharashiwMandirosmanabadtuljabhawanivikas arakhadaआमदारखासदार ओमराजे निंबाळकरतुळजापूरपालकमंत्री प्रताप सरनाईकराणा जगजितसिंह पाटीलसांस्कृतिक मंत्री आशिष शेलार
Previous Post

इटकूर व घाटपिंपरी येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांची पाहणी

Next Post

राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!