• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 19, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई | लोकमदत न्यूज 

दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन विभागाने केला असून, यामुळे प्रवासीसंख्या आणि उत्पन्न दोन्ही वाढतील, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की,एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस असून त्यास तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये ३,००० ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने ताफ्यात येणार असून त्यांना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात येणार आहे. या बसेस दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. तसेच ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागांसाठी १०० मिडी बसेस आणि खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत.

सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये असून उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. नवीन बसेस ताफ्यात आल्यानंतर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे. बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्नही वाढेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

एसटी ही नफा कमावणारी संस्था नसून राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र खर्च आणि उत्पन्नाचा समतोल साधत किमान तोटा टाळणे गरजेचे आहे. नव्या ताफ्यासह ‘लालपरी’ पुन्हा एकदा नव्या जोमाने राज्याच्या कानाकोपऱ्यात धावेल आणि यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल, असा विश्वास देखील सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या उपस्थितीत साजरी

Next Post

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

Next Post

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई
  • गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा!
  • सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा
  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

Recent Comments

  1. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.