• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जलजीवन मिशन योजनेत गंभीर अनियमितता चुकीचे अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल – विकास बनसोडे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

जलजीवन मिशन योजनेत गंभीर अनियमितता चुकीचे अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल – विकास बनसोडे

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बनसोडे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की, त्यांनी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला माहिती अधिकार अंतर्गत अर्ज सादर केला होता. मात्र, माहिती देण्यास विलंब लावण्यात आला. त्यानंतर त्यांनी अपील अर्ज सादर केल्यानंतर दोन महिन्यांच्या उशिराने अपूर्ण माहिती देण्यात आली. विशेषतः निविदेद्वारे नियुक्त गुत्तेदार आणि योजनांच्या प्रगतीविषयी मागवलेली माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

बनसोडे यांच्या मते, विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गावांमध्ये ऑनलाईन संकेतस्थळावर १०० टक्के नळजोडणी दाखविण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष तपासणीत केवळ ५० ते ६० टक्के घरांनाच नळ कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. “राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची शाबासकी मिळविण्यासाठी काही तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी खोटे अहवाल सादर केले असून, निधी प्राप्त करण्यासाठी चुकीची आकडेवारी नोंदवली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

“दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या या महत्त्वाच्या योजनेत भ्रष्टाचार आणि चुकीची नोंद टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी. दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी,” अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

सदर निवेदनासोबत संबंधित माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली कागदपत्रेही त्यांनी संलग्न केली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags:  dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकवंचित बहुजन आघाडी
Previous Post

Next Post

कर्तव्यदक्ष प्रशासक वसुधा फड यांना पदोन्नती – धाराशिवनंतर लातूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

कर्तव्यदक्ष प्रशासक वसुधा फड यांना पदोन्नती – धाराशिवनंतर लातूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!