• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एनव्हीपी शुगरची अल्पावधीत उत्कर्षाकडे झेप – संदीपान महाराज हासेगावकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 5, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

*एनव्हीपी शुगरची अल्पावधीत उत्कर्षाकडे झेप – संदीपान महाराज हासेगावकर*

*एनव्हीपी शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ*

धाराशिव –
एनव्हीपी शुगर या कारखान्याने  अल्प कालावधीत सूक्ष्म नियोजन आणि शेतकऱ्यांचा विश्वास या बळावर उत्कर्षाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन
आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परीक्षक संदीपान महाराज हासेगावकर यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि.   या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. 5) संदीपान महाराज हासेगावकर आणि जनता बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागजी येथील प्रगतशील शेतकरी रंगनाथ सावंत, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, कडकनाथवाडी येथील विश्वनाथ पाटील, लेखा परिक्षक सचिन शिंदे, टेंभुर्णी येथील स्वराज ट्रॅक्टरचे वितरक हिम्मतराव पाटील, उमरगा- लोहारा विधानसभेचे युवा नेते अजिंक्य बाबा पाटील हे उपस्थित होते.

हासेगावकर महाराज म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील हे उद्योग क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यामुळेच कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संत गोरोबा काकांच्या भूमीत औद्योगिक प्रगती पाहून समाधान वाटते. कारखान्याची पुढील काळात भरभराट होवो, असे शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.


*चेहरा आणि चारित्र्य पाहूनच कारखाना चालतो – वसंतराव नागदे*
वसंतराव नागदे यांनी, साखर कारखाना हा चेहरा आणि चारित्र्य पाहूनच चालत असतो असे सांगून विश्वास नसला तर शेजारी कारखाना असला तरी शेतकरी त्यांना ऊस न देता दूरच्या कारखान्याला ऊस देतो असे ते म्हणाले. एनव्हीपी शुगरच्या वतीने शेतकऱ्यांना वेळेवर बिल दिले जाते याचा आनंद वाटतो. ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. चेअरमन नानासाहेब पाटील यांच्या अनुभवामुळे यावर्षीचा गळीत हंगाम आणखी चांगला होईल असेही त्यांनी सांगितले.

*एनव्हीपी शुगरची टॉपच्या कारखान्यात नोंद होईल अा. प्रवीण स्वामी*
आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, साखर कारखाना म्हटले की आपण पश्चिम महाराष्ट्राकडे बघतो. पण आता मराठवाडा विशेषतः धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी आदर्श साखर कारखाना कसा असावा याचे उदाहरण इतर कारखान्या समोर ठेवले आहे. त्यातीलच एक म्हणजे एनव्हीपी शुगर हा कारखाना आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला गेला की लवकर बिल मिळावे ही अपेक्षा असते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन एनव्हीपी शुगरने अवघ्या पंधरा दिवसांत बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे एनव्हीपी शुगरची पुढील काळात टॉपच्या कारखान्यात नोंद होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

*एनव्हीपी शुगरचे नियोजन चांगले – मकरंद राजेनिंबाळकर*
मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले, एनव्हीपी शुगर गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी तत्परतेने काम करत आहे. आपण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांची पाहणी केली. त्या कारखान्यांच्या तुलनेत एनव्हीपी शुगरचे नियोजन चांगले दिसून येते. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची लक्ष्मी नांदते. तो भाग स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे यावर कारखान्याचा भर आहे. पुढील काळात चेअरमन नानासाहेब पाटील यांचे नियोजन अधिक प्रभावी होईल. राजे साहेबांच्या परिवारातील हा पहिला कारखाना असून लवकरच आपण बार्शी तालुक्यात कारखाना सुरू करत आहोत, तो राजे साहेबांच्या परिवारातील दुसरा कारखाना असेल, असेही ते म्हणाले.

*अतिवृष्टीमुळे आडव्या झालेल्या उसाची देखील नोंद – नानासाहेब पाटील*
प्रास्ताविकात चेअरमन नानासाहेब पाटील म्हणाले, एनव्हीपी शुगरच्या उभारणी पासून कारखान्याने वेळेवर ऊस तोडणी आणि वेळेवर बिल देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. तोच उपक्रम यावर्षी आणि यापुढेही कायम राहील. यंदा अतिवृष्टीमुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आडव्या झालेल्या उसाची देखील नोंद घेण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी दीड ते पावणेदोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या आणखी पाऊस झाला असल्यामुळे वाहने रानात जाऊ शकत नाहीत. म्हणून पुढील दहा दिवसांनंतर ऊस तोडणी सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक अप्पासाहेब व्यंकटराव पाटील,
चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील, कार्यकारी संचालक कृष्णा नानासाहेब पाटील, धनंजय व्यंकटराव पाटील, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले यांच्यासह ऊस वाहतूक ठेकेदार, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम टाळून खासदार अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला
गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कार्यक्रम टाळून कालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी धावून गेले.  त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीचा उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात कौतुक करून गौरवोद्गार काढले.

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलऊस उत्पादक शेतकरीऊस गाळपखासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरजागजीधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशुगर फॅक्टरीसाखर कारखाना
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील १५१ उमेदवारांना अनुकंपा व MPSC मार्फत नियुक्ती आदेश 

Next Post

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!