• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 19, 2026
in क्राईम
0
कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!
0
SHARES
404
VIEWS

कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण! कळंब पोलीसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह, एसपी दखल घेणार का?

कळंब | लोकविचार

कळंब शहरात अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग, छेडछाड आणि अखेर तिच्या घरात घुसून मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणानंतर कळंब शहर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील एका अल्पवयीन मुलीचा काही टवाळखोरांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पाठलाग केला जात होता. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात तिची छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप आहे.

सुरुवातीला भीतीपोटी हा प्रकार दडपला गेला; मात्र संबंधित मुलीने धाडस दाखवत आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितला.यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेण्याऐवजी संबंधित तरुणांच्या पालकांशी संवाद साधून मुलांना समज देण्याचा प्रयत्न केला.

मात्र यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. आरोपानुसार, काही तरुणांनी थेट मुलीच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तिच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ / मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक नागरिक एकत्र येऊन जमाव पोलीस ठाण्यात गेले आणि संबंधितांवर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नागरिकांच्या मते, ही केवळ एक घटना नसून कळंब शहरात गेल्या काही महिन्यांपासून टवाळखोरांचा वाढता उपद्रव गंभीर चिंता निर्माण करणारा आहे.शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वाजवत रस्त्यांवर दहशत निर्माण करणे, शाळा-महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

त्याचबरोबर खुलेआम सुरू असलेली गुटखा विक्री, वारंवार कारवाया होऊनही सुरू असलेले अवैध धंदे, पत्त्यांचे क्लब आणि अलीकडील विविध गुन्हेगारी घटना यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

“मुली सुरक्षित आहेत का?”, “शाळा आणि महाविद्यालयात मुलींना निर्धास्तपणे पाठवावे का?”, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?” असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेकांनी कळंब पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढविणे, महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेनंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.कळंब शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनाची भूमिका आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित घटनेची चौकशी करावी, तसेच कळंब शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, यासाठी कळंब शहरात एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, नागरिकांच्या वाढत्या असंतोषाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकळंबकायदा व सुव्यवस्थाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपोलिसपोलिस अधीक्षक रितू खोखर
Previous Post

Next Post

धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!