• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ लाख ५८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 10, 2026
in क्राईम
0
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ लाख ५८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल!
0
SHARES
157
VIEWS

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ लाख ५८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल!

नळदुर्ग, प्रतिनिधी, अझहर शेख

डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच राज्यात नेहमीप्रमाणे आपल्या धडाकेबाज कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात अन्न भेसळ, बेकायदेशीर औषध विक्री आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून नळदुर्ग शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी एक मोठी कारवाई केली. शहरात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि जर्द्याच्या साठ्यावर धाड टाकून प्रशासनाने तब्बल ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पडला छापा मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नळदुर्ग येथील रहिवासी इस्माईल जबीउल्ला काझी याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित तंबाखूजन्य जर्द्याचा मोठा साठा करून ठेवण्यात आला असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला आणि हा अवैध साठा जप्त केला. ही धडक कारवाई मंगळवारी, ९ जून रोजी करण्यात आली.याबेकायदेशीर तंबाखू साठवणूक प्रकरणी ९ जून २०२६ रोजी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी इस्माईल काझी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.सदरची धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी. डी. इंबडे यांनी केली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोदकुमार काकडे धाराशिव व सह-आयुक्त एस. आर. कारकाळे छत्रपती संभाजीनगर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे नळदुर्ग आणि परिसरातील अवैध सुगंधित तंबाखू विक्रेते व साठेबाजांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यभरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर वचक बसणार आहे. प्रशासनाने यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

“दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांवर पोलिसांचा दणका

Next Post

उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक

उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!