• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार भारत विद्यालय जवळील भाग बनला दलालीचा अड्डा !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 10, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार भारत विद्यालय परिसर बनला दलालीचा अड्डा !

कार्यालयावरच दलालांनी घेतला ताबा !

धाराशिव / लोकमदत न्यूज

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ हे खास बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सुरु केलेले आहे. या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत व कामगारांना संसार उपयोगी साहित्य देण्यासह त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या कल्याणकारी मार्गात एजंट दलाल व समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवणाऱ्या पांढरी कपडे अंगावर परिधान करीत गल्लोगल्ली आणि प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन धुंडाळा घेत  हिंडणाऱ्या चिंधीचोर दलालांनी घुसखोरी केलेली आहे.  याचा प्रत्यक्ष अनुभव धाराशिव शहरातील भारत विद्यालय जवळील माशायक मोहल्ला परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला. हुसेनी यांच्या घरासमोर दलालांच्या माध्यमातून बोगस बांधकाम कामगारांना देण्यात येणारे साहित्य या ठिकाणी आणून त्याची जाहीरपणे दलाली घेऊन बोगस बांधकाम कामगार खरे असल्याचे भासवून खऱ्या व गरजवंत बांधकाम कामगारांना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याचे समोर आले. याची कुजबुज लागताच पत्रकारांचा ताफा तेथे धडकला. पत्रकार आहोत असा आवाज ऐकताच दलालांनी ते साहित्य जागच्या जागी ठेवून धूम ठोकण्यात धन्यता मानली. तर साहित्य नेण्यासाठी आलेल्या बोगस कामगारांनी देखील आणलेली टू व्हीलर व चार चाकी वाहने जागीच सोडून पाळण्यास सुरुवात केली. हा गोरख धंदा सजग नागरिकांच्या चाणाक्ष नजरेमुळे उघडकीस आला. मात्र जिल्ह्याच्या विविध भागात बोगस कामगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असून दलालीला तर अक्षरशः हागणदारीतील….सारखा ऊत आलेला आहे. त्यामुळे हे साहित्य गोडाऊनमधून गल्लोगल्ली दलालांच्या अड्ड्यावर आले कसे ? याची चौकशी करून संबंधिताला निलंबित करावे अशी मागणी वंचित लाभार्थ्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जातो. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, बांधकाम करताना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आवश्यक ते सुरक्षा साहित्य, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार दरवर्षी अर्थसहाय्य, घरकुल योजनेचा लाभ, विमा सुरक्षा आणि वेळोवेळी आवश्यकतेनुसार आवश्यक ती मदत केली जाते. फेब्रुवारी २०२६ मध्ये या बांधकाम कामगारांना पेटी, स्टीलची टाकी, पातेले, परात, वाटी, ग्लास, बॅग, हॅन्ड ग्लोज, फायबर टोपी, गम बूट, रबरी हात मोजे व शैक्षणिक बॅग आदींसह इतर साहित्य महाराष्ट्र शासनाकडून धाराशिव येथील बांधकाम कार्यालयास प्राप्त झाले होते. ते साहित्य धाराशिव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यातील काही साहित्य मागील आठवड्यात उमरगा, लोहारा व इतर तालुक्यातील काही कामगारांना गोडाऊन असलेल्या ठिकाणीच वितरित केलेले आहे. तर इतरांना तुमचे ऑनलाईन होत नाही, उद्या या आता रात्र झाली आहे, असे थातुरमाथूर कारण सांगत खऱ्या बांधकाम कामगारांना हुसकावून लावले. तर दुसऱ्या दिवशी ते कामगार आल्यानंतर तुमच्या तालुक्याचा नंबर आता संपलेला आहे. साहेबांना विचारून तुमच्या तालुक्याची तारीख तुम्हाला कळविली जाईल असे सांगून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र दलालांनी रचले. ते राहिलेले साहित्य अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्या साखळीद्वारे रात्रीची योग्य वेळ पाहून ट्रक व टेम्पो आदी वाहनांमध्ये ते साहित्य दलालामार्फत विक्री करण्यासाठी इतरत्र स्थलांतरित केले. ते साहित्य मिळाल्यानंतर संबंधित दलालांनी ५ हजार रुपये घेऊन मी तुमचे बांधकाम कामगारांच्या यादीमध्ये नांव समाविष्ट केलेले आहे. संसारिक साहित्य आलेले असून त्यासाठी दीड हजार रुपये घेऊन बोगस कामगारांच्या माध्यमातून ते वितरित केल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित अभियंताच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी

या महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. त्या नोंदणीमध्ये सत्यता आहे का ? ती नोंदणी कोणत्या दलालामार्फत केली जाते ? त्या नोंदणीसाठी किती रक्कम घेतली जाते ? त्या लाभार्थ्यांना जो आर्थिक लाभ दिला जातो तो राष्ट्रीयकृत बँकेत द्यावेत असे सरकारचे फक्त आदेश आहेत. मात्र, त्या लाभार्थ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँका ऐवजी गल्लीबोळात फक्त कागदोपत्री थाटलेल्या बँकांमध्ये संबंधित बांधकाम कामगारांची बँक खाती उघडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अभियंत्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी होऊ लागली आहे.


गुत्तेदारांची नोंदणी रद्द करावी

कुठल्याही प्रकारचे काम न करणाऱ्या व्यक्तीस शासकीय नोंदणीकृत ठेकेदाराने आमच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे कोणत्या शासकीय ठेकेदाराने किती प्रमाणपत्रे दिली आहेत ? ती खरोखरच सत्य आहेत की नाहीत ? याची चौकशी करावी. चौकशी करून संबंधित संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत त्याचा नोंदणी परवाना रद्द करावा अशी मागणी खरे व वंचित असलेले बांधकाम कामगार करीत आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

हॉटेल बडेमियातर्फे जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची एकमताने निवड

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची एकमताने निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!