• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सोलर व पवनचक्की प्रकल्पातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरण उघड..10 गुन्हे

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 7, 2026
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सोलर व पवनचक्की प्रकल्पातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरण उघड..10 गुन्हे
0
SHARES
234
VIEWS

 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सोलर व पवनचक्की प्रकल्पातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरण उघड..10 गुन्हे आणि लाखोंच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात

धाराशिव लोकविचार 

धाराशिव जिल्ह्यात सोलर प्लांट व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या केबल व वायर चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी आणि निर्णायक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत एकूण 195 किलो तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा सुमो वाहन असा मिळून सुमारे ₹6,42,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सोलर प्लांट व पवनचक्की प्रकल्पांमध्ये मागील काही काळापासून तांब्याच्या केबल्स व महागड्या साहित्याची चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

दि. 7 जून 2026 रोजी स.पो.नि. सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे येडशी परिसरातून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. आरोपींना टाटा सुमो वाहनासह शेतात पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने तेरखेडा, रुईभर, कडगाव, डोकी, साबळेवाडी, आरसोली (ता. भूम), गौरगाव व मस्सा (ता. कळंब) या भागातील सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या तारा व केबल चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत एकूण 195 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणातून आतापर्यंत 10 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी उर्फ नाना संजय काळे (रा. खामकर पारधी पेढ, ता. वाशी, जि. धाराशिव) याचा समावेश असून दुसरा आरोपी विधीसंघर्षित बालक असल्याची माहिती समोर आली आहे.

जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स. पो. नि. सुदर्शन कासार तसेच पथकातील पो. ह. शौकत पठाण, प्रकाश आवताडे, जावेद शेख, फरहान पठाण, कोळी, चा. पो. ह. रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील सोलर व पवनचक्की प्रकल्पांतील चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

 “सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात”  सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

Next Post

लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!