• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 19, 2026
in राजकारण
0
फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल
0
SHARES
106
VIEWS

फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

धाराशिव लोकविचार केंद्रीय विद्यालयाच्या प्रस्तावावर कोणताही ठोस पाठपुरावा नसताना केवळ श्रेय लाटण्यासाठी पत्रकबाजी करणारे आमदार राणा पाटील पुन्हा एकदा तोंडावर आपटले असून, अशा फुकटच्या श्रेयाच्या राजकारणाला जनता ओळखून आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी केला आहे.

शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका करत, केंद्रीय विद्यालयाच्या प्रश्नावर त्यांनी प्रसिद्ध केलेली माहिती अर्धवट व दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला.

कोणतीही खातरजमा न करता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पत्रके काढण्याची जुनी सवय राणा पाटील यांनी आता बंद करावी, असा इशाराही त्यांनी दिला.गुरव म्हणाले की, धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय मंजूर व्हावे यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी २०२२ पासून सातत्याने लोकसभेत पाठपुरावा केला आहे. लोकसभेच्या कामकाजात या विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली असून, संबंधित विभागासोबत दोन बैठका देखील झाल्या आहेत.

आगामी अधिवेशनात २७ जुलै रोजी याच विषयावर प्रश्न उत्तरासाठी येणार आहे. ९ जुलै रोजी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रक्रिया सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांचे पथक धाराशिवमध्ये पाहणीसाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय मार्च २०२५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.

या बैठकीत विद्यालयासाठी जागेची निवड, आवश्यक प्रस्ताव पाठविणे आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याबाबत चर्चा झाली होती. या सर्व बाबी शासकीय नोंदींमध्ये उपलब्ध असून, त्याचे पुरावेही आहेत. त्यामुळे आता श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी करून इतिहास बदलता येणार नाही, असा टोला गुरव यांनी लगावला.

आमदार राणा पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातील सर्वात मोठी चूक म्हणजे पाहणी पथकाच्या भेटीची तारीख असल्याचेही गुरव यांनी नमूद केले. कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात केंद्रीय विद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी संबंधित पथक २२ जुलै रोजी धाराशिवमध्ये येणार आहे. चुकीची तारीख देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदारांनी आता तरी सत्य माहिती देणारे आणखी एक पत्रक काढावे, म्हणजे ते त्यांच्या स्वभावालाच शोभेल, असा उपरोधिक टोला गुरव यांनी लगावला.

केंद्रीय विद्यालयाच्या प्रश्नावर केलेल्या पाठपुराव्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार राणा पाटील यांची पत्रकबाजी जनतेसमोर उघडी पडली असून, वस्तुस्थिती आणि शासकीय नोंदींच्या आधारे सत्य समोर येईल, असा दावा करत सोमनाथ गुरव यांनी राणा पाटील यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

Next Post

राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!