• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 17, 2026
in क्राईम
0
मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 
0
SHARES
216
VIEWS

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ? 

टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह,सुरक्षा ठेव किती हेही गुलदस्त्यात!

धाराशिव लोकविचार

 अंबाजोगाई येथील विद्युत सागर स्वयंरोजगार सुशिक्षित बेरोजगार संस्था या संस्थेच्या कार्यक्षेत्राबाबत आणि धाराशिव व लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या आऊटसोर्सिंग कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात टेंडर प्रक्रियेची पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संस्थेच्या नोंदणीकृत उद्देश व नियमावलीनुसार तिचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई शहर व परिसरापुरते मर्यादित असल्याचे नमूद आहे. तसेच संस्थेच्या सभासदांनाच काम देण्याची तरतूद असून पदाधिकारी व सदस्य हे संबंधित कार्यक्षेत्रातील असणे अपेक्षित असल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते.

मात्र, याउलट ही संस्था धाराशिव व लातूर जिल्ह्यात विविध विभागांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यक्षेत्राबाहेर संस्थेला नेमक्या कोणत्या नियमांनुसार कामे देण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, मानव संसाधन विभागाने या त्रुटी वरिष्ठाच्या निदर्शनास आणून दिल्या तसेच विभागीय कार्यालय लातूर यांच्याही निदर्शनास आणून दिल्या तरीही

अधीक्षक अभियंता श्री संजय आडे हे नियमानुसारच टेंडर दिले असल्याचे सांगतात.

संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतातून ही प्रक्रिया पार पडली असावी, अशीही चर्चा असून त्यामुळे धाराशिव व लातूर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक पात्र संस्था किंवा बेरोजगारांना संधी न देता कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कामे देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित संस्थेच्या कामकाजाबाबत यापूर्वीही विविध स्तरावर प्रश्न उपस्थित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संस्थेची नोंदणी, नियमावली, कार्यक्षेत्र, सभासद नोंद, टेंडर प्रक्रिया, पात्रता निकष तसेच कामांचे वाटप यासंदर्भातील सर्व मूळ कागदपत्रांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.

याशिवाय, संबंधित टेंडर मंजूर करणारे अधिकारी, त्यांची भूमिका, मंजुरीची प्रक्रिया आणि कार्यक्षेत्राबाहेर कामे देण्यामागील कारणांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले आहे की सर्व प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पार पडली आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादऊर्जामंत्रीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

Next Post

फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

Related Posts

क्राईम

September 1, 2026
ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!
क्राईम

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
Next Post
फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

ताज्या घडामोडी

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

September 1, 2026

September 1, 2026
ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!