• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 16, 2026
in महाराष्ट्र
0
प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर
0
SHARES
66
VIEWS

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर

रस्ते, गतिरोधक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नगराध्यक्ष नेहा काकडे यांचे लवकर कामे सुरू करण्याचे आश्वासन

धाराशिव लोकविचार 

धाराशिव शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका सौ. रुपालीताई सुनील आंबेकर यांनी आज नगराध्यक्ष सौ नेहा काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात त्यांनी प्रभागातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय (खराब) झाल्याचे नमूद केले आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याशिवाय प्रभाग क्रमांक ९ मधील विविध रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणीही करण्यात आली. परिसरात अनेक कोचिंग क्लासेस असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने गतिरोधक उभारून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नगरसेविका आंबेकर यांनी केली.

यावेळी नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी निवेदनाची दखल घेत प्रभाग क्रमांक ९ मधील मंजूर रस्त्यांची कामे तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक खलिफा कुरेशी, पंकज भोसले, अयाज उर्फ बबलू शेख, इस्माईल शेख, विशाल शिंगाडे, सुनील आंबेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

Next Post

तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!