• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’; एसटीत डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम — परिवहन मंत्री सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 26, 2026
in महाराष्ट्र
0
‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’; एसटीत डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम — परिवहन मंत्री सरनाईक
0
SHARES
129
VIEWS

‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’; एसटीत डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम — परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

दररोज १००० लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट; उत्कृष्ट चालक व आगारांना विशेष प्रोत्साहन

मुंबई लोकविचार :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती” ही व्यापक मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

या संदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, राज्यातील सर्व विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना तातडीने डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज बनली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट साध्य केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज सुमारे १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

“लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते. हीच बचत भविष्यात एसटी महामंडळासाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आगाराने बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिझेल बचतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यांना प्रोत्साहनपर भत्ताही दिला जाणार आहे. तसेच निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत करणाऱ्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

इंधन बचतीसाठी चालकांना वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे तसेच ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याशिवाय बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यभरातील एसटी आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करून “इंधन बचत” ही चळवळ अधिक प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी; आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारीपदी नियुक्ती

Next Post

धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!