• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 26, 2026
in क्राईम
0
धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
103
VIEWS

धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहरात अवैध गावठी दारू विक्री आणि निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मोठी मोहीम राबवत एकाच दिवशी तब्बल ११ ठिकाणी धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या आदेशान्वये विशेष पथकाने केली.

पोलीस पथकाने शहरातील इंदीरानगर, पारधी पिढी, वडार गल्ली, तुळजापूर रोड, सांजा रोड, बार्शी रोड परिसरात छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत सुरेख राजेंद्र आयवळे, बालाजी कठारे, नंदा पवार, आशाबाई चव्हाण, जितेंद्र पाटील, नगीना काळे, नानीबाई पवार, दत्ता कांबळे, किरण कांबळे, पिराजी पवार तसेच गजरुबाई ऊर्फ गौरी पवार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारा रासायनिक साठा जप्त करण्यात आला.

विशेषतः पारधी पिढी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत शेकडो लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आल्याने अवैध दारू निर्मितीचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल लाखोंच्या घरात असून या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवत शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी मोहिमेला या कारवाईमुळे अधिक बळ मिळाले असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी नागरिकांनी अवैध दारू विक्री तसच अवैध धंद्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’; एसटीत डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम — परिवहन मंत्री सरनाईक

Next Post

नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post
नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!

नळदुर्ग शहरात 'ईद-उल-अजहा' उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!